उच्च शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 12:57 PM2022-06-26T12:57:42+5:302022-06-26T12:58:27+5:30

खालील अभ्यासक्रमांसाठी ५० टक्के ट्यूशन फी व ५० टक्के परीक्षा फी सरकारकडून दिली जाते. कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न वार्षिक रु. ८ लाखांपेक्षा कमी असावे. तसेच प्रवेश कॅपमधून असावे. 

Scholarship Scheme for Higher Education | उच्च शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती योजना

उच्च शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती योजना

googlenewsNext

आनंद मापुस्कर, करिअर मार्गदर्शक

कृषी शिक्षण विभाग
खालील अभ्यासक्रमांसाठी ५० टक्के ट्यूशन फी व ५० टक्के परीक्षा फी सरकारकडून दिली जाते. कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न वार्षिक रु. ८ लाखांपेक्षा कमी असावे. तसेच प्रवेश कॅपमधून असावे. 
-  पदविका - कृषी पदविका
-  पदवी - बी.एस्सी. ऑनर्स (कृषी), बी.एस्सी. ऑनर्स (उद्यानविद्या),  बी.एस्सी. ऑनर्स (वनविद्या), बी.एस्सी. ऑनर्स (सामाजिक विज्ञान), बी.एस्सी. ऑनर्स (पशुसंवर्धन) , बी.एफ.एस्सी. (मत्स्य विज्ञान),  बी.टेक. (जैवतंत्रज्ञान), बी.टेक. (अन्न तंत्रज्ञान), बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी)
-  पदव्युत्तर  अभ्यासक्रम - वरील अभ्यासक्रमांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम

पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभाग  
महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठातील सर्व अभ्यासक्रम या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
-  पदविका - दुग्धव्यवसाय व्यवस्थापन, पशुसंवर्धन व्यवस्थापन
-  पदवी - प्राणिशास्त्र व पशुसंवर्धन, दुग्धतंत्रज्ञान, मत्स्यविज्ञान
-  पदव्युत्तर पदवी - प्राणिशास्त्र
वार्षिक उत्पन्न रू २.५० लाख किंवा त्याहून कमी आहे त्यांच्या पाल्यांना शासकीय व अनुदानित महाविद्यालयामध्ये १००% ट्यूशन फी, विना अनुदानितसाठी ५०% टयूशन फी, वार्षिक उत्पन्न रु. २.५ लाख ते रु. ८ लाख असेल तर ५०% टयूशन फी सरकारकडून. 
  
कला संचलनालय 
-  व्यावसायिक  अभ्यासक्रमांसाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न रू २.५० लाख किंवा त्याहून कमी आहे त्यांच्या पाल्यांची शासकीय व अनुदानित महाविद्यालयामधील १००% ट्यूशन फी तर विना अनुदानित महाविद्यालयातील ५०% टयूशन फी सरकार देते. 
-  वार्षिक उत्पन्न रु. २.५ लाख ते रु. ८ लाख असेल तर ५०% टयूशन फी (सर्व प्रकारच्या महाविद्यालयांसाठी) सरकारकडून दिली जाते.

अभ्यासक्रम 
बॅचलर ऑफ फाईन आर्ट - 
१. चित्रकला २. शिल्पकला ३. इंटिरियर डेकोरेशन ४. सिरॅमिक्स ५. मेटल वर्क  ६. टेक्सटाईल डिझाइन
बॅचलर ऑफ अप्लाईड आर्ट 

महत्त्वाचे - जेथे सरकार ५० टक्के फी देणार असेल तेथे केवळ ५० टक्के फी भरायची आहे.  
अभिमत विद्यापीठे व खाजगी विद्यापीठे, मॅनेजमेंट किंवा संस्था स्तरावर प्रवेश घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नसतील.
सविस्तर माहितीसाठी https://mahadbtmahait.gov.i- / ही वेबसाईट पहावी. 
 

Web Title: Scholarship Scheme for Higher Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.