मुलीपासून दूर राहिल्या, लोकांनी टोमणे मारले; SDM होऊन पूनम यांनी दिले टीकाकारांना उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 02:11 PM2022-11-29T14:11:50+5:302022-11-29T14:12:04+5:30

ही गोष्ट SDM पूनम गौतम यांची आहे. अभ्यासासाठी पूनम आपल्या मुलीपासून दूर झाल्या.

SDM Poonam Success Story: Stayed away from daughter, people taunted; but Poonam gautam become SDM | मुलीपासून दूर राहिल्या, लोकांनी टोमणे मारले; SDM होऊन पूनम यांनी दिले टीकाकारांना उत्तर

मुलीपासून दूर राहिल्या, लोकांनी टोमणे मारले; SDM होऊन पूनम यांनी दिले टीकाकारांना उत्तर

Next

SDM Poonam Success Story: आपल्या मुलापासून दूर राहणे ही आईसाठी सर्वात कठीण गोष्ट आहे. यातच मुलांपासून दूर राहिल्यामुळे आईला टोमणे मारणे, त्याहूनही कठीण गोष्ट आहे. आज आम्ही तुम्हाला अशा आईबद्दल सांगणार आहोत, जिने लोकांचे टोमणे ऐकले, पण या टोमण्यांना SDM बनून उत्तर दिले.

ही गोष्ट SDM पूनम गौतम यांची आहे. अभ्यासासाठी पूनम आपल्या मुलीपासून दूर झाल्या आणि दिल्लीला आल्या. त्यांच्यासाठी दिल्लीला येणे खूप कठीण होते, पण काहीतरी मोठे काम करण्यासाठी हे पाऊल उचलणे गरजेचे होते. पूनम दिल्ली आल्यावर लोकांनी त्यांना अनेक टोमणे मारले. मुलीला सोडून अभ्यास करत असल्याची टीकाही त्यांच्यावर झाली. पण, त्यांनी आपले लक्ष विचलित न होऊन देता अभ्यास करत राहिल्या.

पूनम यांनी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेकांनी त्यांना डिमोटिव्हेट केले. पूनम हिंदी मीडियममधून शिकल्या होत्या. हिंदी मीडियमवाल्यांसाठी हा अभ्यास सोपा नसतो, अशाप्रकारचे सल्ले त्यांना मिळाले. तरीदेखील पूनम यांनी आपल्या अभ्यासावरील फोकस कायम ठेवला. अनेकदा मुलीच्या आठवणीत त्यांना रडू यायचे, पण चांगल्या भविष्यासाठी हे गरजेचे होते.

पूनम यांच्या स्ट्रॅटेजीबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी सर्वात आधी सिलॅबसप्रमाणे स्टडी मटेरीअल गोळा केले आणि एक स्ट्रॅटेजी बनवली. आपल्या स्ट्रॅटेजीनुसार त्यांनी अभ्यास सुरू केला. पूनमने प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यूचा वेगवेगळा अभ्यास केला. अखेर मेहनतीचे पूनम यांना फळ मिळाले आणि यूपीपीसीएस 2019 मध्ये त्यांनी तिसरी रँक मिळवून SDM पद मिळवले.

Web Title: SDM Poonam Success Story: Stayed away from daughter, people taunted; but Poonam gautam become SDM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.