पालकांचा अर्धा पगार मुलांच्या शिक्षणावर खर्च; भरमसाट फी आकारूनही शाळांमध्ये शिक्षण मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 06:47 AM2023-04-10T06:47:34+5:302023-04-10T06:47:55+5:30

कोरोनाच्या काळात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या मुलांच्या शिक्षणाचा घसरलेला दर्जा अद्याप रुळावर आलेला नाही. 

Spend half of parents salary on children's education; Education is not provided in schools despite charging exorbitant fees | पालकांचा अर्धा पगार मुलांच्या शिक्षणावर खर्च; भरमसाट फी आकारूनही शाळांमध्ये शिक्षण मिळेना

पालकांचा अर्धा पगार मुलांच्या शिक्षणावर खर्च; भरमसाट फी आकारूनही शाळांमध्ये शिक्षण मिळेना

googlenewsNext

नवी दिल्ली :

कोरोनाच्या काळात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या मुलांच्या शिक्षणाचा घसरलेला दर्जा अद्याप रुळावर आलेला नाही. 

नुकताच देशभरातील मुलांच्या वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये ६० टक्के मुलांना सरासरी १० ते ४० टक्के कमी गुण मिळाले आहेत. भरमसाठ फी आकारूनही शाळांनी मुलांचा पाया भक्कम करण्यासाठी काहीही केले नाही, ही पालकांची व्यथा आहे. पालकांना चांगल्या शाळांवर अवलंबून न राहता ट्युशनवर अधिक भर द्यावा लागला. ऑनलाइन कोचिंग व्यवसाय १७ टक्के वार्षिक दराने वाढत आहे. तो २०२७पर्यंत तब्बल १० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असू शकते.

शिक्षक झाले बेफिकीर 
भरमसाठ फी आकारूनही शाळा मुलांकडे लक्ष देत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शहरी शाळांमधील ४९ टक्क्यांपेक्षा जास्त मुले शिकवणी घेतात त्यामुळे शिक्षक बेफिकीर होतात. कोचिंगमुळे मुले शाळेत गांभीर्याने अभ्यास करत नाहीत.

२० ते ५०% पर्यंत ट्युशनवर खर्च
प्रत्येक कुटुंब उत्पन्नाच्या सरासरी २० ते ५० टक्क्यांपर्यंत मुलांच्या शाळेची फी आणि ट्युशनवर खर्च करते. 
देशातील ७.५ कोटींपेक्षा अधिक विद्यार्थी कोचिंग किंवा ट्युशन घेतात. यामध्ये ४.५ कोटी मुले आणि तीन कोटी मुली आहेत. ग्रामीण भागातील गरीब २० टक्के लोकसंख्येमध्ये १७ टक्के, तर शहरांमध्ये ३९ टक्के मुले ट्युशन घेतात.

- शैक्षणिक स्थितीचा वार्षिक अहवाल २०२२नुसार, ट्युशन घेणाऱ्या मुलांचे प्रमाण २०१८ मध्ये २६.४ टक्के वरून २०२२ मध्ये ३०.५ टक्केपर्यंत वाढले आहे. 
- उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांमध्ये ही वाढ ८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये हा ट्रेंड कमी झाला आहे.

ट्युशन ट्रेंड कुठे जास्त? 
राज्य    २०१८    २०२२ 
प. बंगाल    ७१.८%    ७३.९%
बिहार    ६१.६    ७१.७%
उत्तर प्रदेश    १५.७    २३.७
गुजरात    १४.८    १९.६
महाराष्ट्र    ११.६    १५.८
राजस्थान    ४.५    ४.६
कर्नाटक    ११.२    ९.२
तामिळनाडू    १४.३    ९.५

Web Title: Spend half of parents salary on children's education; Education is not provided in schools despite charging exorbitant fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.