महाराष्ट्राचा श्रीकेथ रवी देशात सातवा, नीट परीक्षेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2023 08:25 AM2023-06-14T08:25:00+5:302023-06-14T08:25:12+5:30

तामिळनाडूचा प्रभंजन जे. पहिला

Sriketh Ravi of Maharashtra ranks 7th in the country, NEET result declared | महाराष्ट्राचा श्रीकेथ रवी देशात सातवा, नीट परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्राचा श्रीकेथ रवी देशात सातवा, नीट परीक्षेचा निकाल जाहीर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश परीक्षा (नीट-यूजी २०२३) परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. तामिळनाडूच्या प्रभंजन जे याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आंध्र प्रदेशचा बाेरा वरुण चक्रवर्ती दुसरा, तर तामिळनाडूचा काैस्तव बाउरी तिसरा आला आहे. महाराष्ट्राच्या श्रीकेथ रवी याने देशात सातवा आणि राज्यात पहिला क्रमांक पटकाविला.

देशातील टाॅप ५० विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये श्रीकेथ रवी ७ यांच्यासह तनिष्क देवेंद्र भगत २७ आणि रिद्धी वाजारिंगकर ४४ व्या स्थानावर आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस प्रवर्गात पलक निशांत शहा ४ थ्या, तर एससी कॅटेगरीमध्ये आयुष राजकुमार रामटेके याने देशात तिसरे स्थान मिळविले. भारतातील ४९९ आणि परदेशातील १४ शहरांतील ४ हजार ९७ केंद्रांवर नीट यूजी परीक्षेचे आयाेजन केले हाेते.

११ लाख ४५ हजार ९७६ विद्यार्थी पात्र  

  • यंदा २० लाख ८७ हजार ४६२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली हाेती. त्यापैकी २० लाख ३८ हजार ५९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
  • त्यापैकी ११ लाख ४५ हजार ९७६ विद्यार्थी पात्र झाले असून, महाराष्ट्रातील १ लाख ३१ हजार ८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना https://www.nta.ac.in/ या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.

Web Title: Sriketh Ravi of Maharashtra ranks 7th in the country, NEET result declared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.