SSC & HSC Exams Result: दहावी, बारावीचे निकाल वेळेवरच, विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहण्याचे शिक्षण मंडळाचे आवाहन   

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 06:12 AM2022-04-08T06:12:32+5:302022-04-08T06:13:09+5:30

SSC & HSC Exams Result: राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना आता निकालाचे वेध लागले आहेत.

SSC & HSC Exams Result: 10th, 12th results on time, Board of Education appeals to students to be relaxed | SSC & HSC Exams Result: दहावी, बारावीचे निकाल वेळेवरच, विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहण्याचे शिक्षण मंडळाचे आवाहन   

SSC & HSC Exams Result: दहावी, बारावीचे निकाल वेळेवरच, विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहण्याचे शिक्षण मंडळाचे आवाहन   

googlenewsNext

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना आता निकालाचे वेध लागले आहेत. मात्र विनाअनुदानित शिक्षकांच्या पेपर तपासणीवरील बहिष्कार आंदोलनामुळे निकालाला लेटमार्क लागणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र हे निकाल वेळेतच लागतील, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थी पालकांनी चिंता करू नये, असे त्यांनी आवाहन केले आहे.
दहावी बारावीच्या परीक्षा संपून विभागीय मंडळात उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू आहे. आतापर्यंतच्या तपासणीचा आढावा शिक्षण मंडळाने घेतला असता औरंगाबाद वगळता इतर सर्व विभागांमध्ये तपासणीचे काम सुरळीत सुरू आहे. याबाबत विभागीय मंडळाने तशा सूचना ही शिक्षक, मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. मात्र ही एक अंतर्गत प्रक्रिया असून यामुळे निकालास लेटमार्क लागणार नसल्याचे गोसावी यांनी स्पष्ट केले. 

नव्या वर्षातील प्रवेश प्रक्रियाही नियोजनानुसार 
दहावी आणि बारावीच्या निकालांच्या तारखा राज्य मंडळाकडून अधिकृतरीत्या जाहीर झालेल्या नाही. साधारपणे दरवर्षी १० जूनपर्यंत दहावीचा आणि १५ जूनपर्यंत बारावीचा निकाल लागावा यासाठी मंडळ नियोजन करते. निकाल वेळेत लागल्यास प्रवेशप्रक्रिया पार पडून सर्व महाविद्यालयांचे वर्ग ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान सुरू होतात. यंदा ही मंडळ अशाच प्रकारच्या नियोजनासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे निकाल वेळेवरच लागतील आणि विद्यार्थी पालकांनी निश्चित रहावे, असे आवाहन गोसावी यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: SSC & HSC Exams Result: 10th, 12th results on time, Board of Education appeals to students to be relaxed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.