‘आता महाराष्ट्रातही शाळा सुरू करा’; मागणी वाढू लागली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 07:45 AM2021-08-28T07:45:01+5:302021-08-28T07:45:36+5:30

#आताशाळासुरूकरा : सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असताना मुले शाळेत जाण्यासाठी आतुर झाली आहेत.  दीर्घ काळ मुलांना शाळेपासून दूर ठेवणे त्यांच्या मानसिक व शैक्षणिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य होणार नाही, असे मत युनिसेफ, युनेस्को आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनेही नोंदविले आहे.

‘Start schools in Maharashtra now’; Demand began to grow pdc | ‘आता महाराष्ट्रातही शाळा सुरू करा’; मागणी वाढू लागली

‘आता महाराष्ट्रातही शाळा सुरू करा’; मागणी वाढू लागली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. यामुळे मुलांचे मानसिक, शारीरिक, शैक्षणिक आरोग्य धोक्यात आल्याने लवकरात लवकर शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी सातत्याने होत आहे. या विषयावर परिसंवाद, चर्चा, सोशल मीडियावर #आताशाळासुरूकरा अशी मोहीम सातत्याने सुरू झाली आहे. दिल्लीमध्ये शाळा सुरू करण्यात येणार असल्याच्या निर्णयानंतर या मागणीला जोर मिळाला आहे आणि महाराष्ट्रातही शाळा सुरू करण्याची मागणी शिक्षणतज्ज्ञ, पालक व अभ्यासक करीत आहेत.

सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असताना मुले शाळेत जाण्यासाठी आतुर झाली आहेत.  दीर्घ काळ मुलांना शाळेपासून दूर ठेवणे
त्यांच्या मानसिक व शैक्षणिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य होणार नाही, असे मत युनिसेफ, युनेस्को आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनेही नोंदविले आहे. जनजीवन सुरळीत सुरू आहे, मुले गटागटाने खेळत आहेत. शाळा मात्र गेले दीड वर्ष बंदच आहेत. यासाठी शाळा सुरू झाल्या पाहिजेत, असा सूर शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यातून उमटत आहे.

‘युनिसेफ’च्या मते, शाळा बंद असल्याने मुलांवर याचा गंभीर परिणाम झाला आहे. अनेक विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहेत. बालविवाह, बालमजुरीचे प्रमाण वाढले आहे. शाळा सुरू करण्यास विलंब केल्यास त्रासदायक ठरू शकते. अमेरिकेत सुमारे ९० टक्के विद्यार्थी सरकारी शाळांमध्येच शिकतात. तिथेही १६ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. गुजरात, दिल्ली, कर्नाटकसह अनेक राज्ये शाळा सुरू करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर ग्रामीण व शहरी दोन्ही भागातील मागच्या दीड ते दोन वर्षांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा विचार करून शासनाने लवकर शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा.
- वसंत काळपांडे, शिक्षणतज्ज्ञ

Web Title: ‘Start schools in Maharashtra now’; Demand began to grow pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.