आजपासून राज्यातील ५ वी ते ८ वी च्या शाळा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 11:37 AM2021-01-27T11:37:29+5:302021-01-27T11:44:41+5:30
मुंबईतील शाळांबाबत अद्याप निर्णय नाही
आज २७ जानेवारी २०२१ पासून राज्यातील इ. ५ वी ते ८ वी च्या शाळा पूर्ण काळजी व खबरदारी घेऊन सुरू होत आहेत. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून चला मुलांनो चला शाळेकडे चला ...आशयाचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला असून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थी पालक व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यात सुरुवातीला नववी ते बारावी आणि आजपासून पाचवी ते आठवीच्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या आहेत. मात्र मुंबईतील शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप काहीच निर्णय मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडून घेण्यात आला नसल्याने पालक व संस्थाचालक, मुख्याध्यापक संभ्रमात आहेत.
चला मुलांनो चला शाळेकडे चला ... आज दि. २७ जानेवारी २०२१ पासून राज्यातील इ. ५ वी ते ८ वी च्या शाळा पूर्ण काळजी व खबरदारी घेऊन सुरू होत आहेत. विद्यार्थी, पालक व शिक्षकांना खूप शुभेच्छा ! @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@scertmahapic.twitter.com/vZ0DAgJ8Eg
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) January 27, 2021
मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या मागील पत्रकाप्रमाणे १६ जानेवारीपासून पुढील निर्देशांपर्यंत मुंबईतील शाळा बंदच राहणार आहेत. दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या तरी मुंबईतील शाळा कनिष्ठ महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.