लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांनी केली कौतुकास्पद कामगिरी, वर्षभरात जिंकल्या 27 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 03:05 PM2021-06-03T15:05:47+5:302021-06-03T15:06:14+5:30
Education News: ठाणे आणि नवी मुंबई येथील विद्यार्थ्यांनी लॉकडाऊन काळातही चिकाटीने सकारात्मकतेला चालना दिली आणि मागील वर्षभरात अनेक स्पर्धांमध्ये बाजी मारली.
ठाणे - कोविड-19 च्या संकटकाळात वर्षभर आभासी शिक्षण, उत्तम शैक्षणिक निकाल लागतील अशी तयारी आणि शाळेसाठी विविध स्पर्धात्मक कार्यक्रमांमध्ये बक्षिसं मिळवणं हे विद्यार्थ्यांनी केले असेल.. ही कल्पनाच वाटते ना! मात्र ठाणे आणि नवी मुंबई येथील विद्यार्थ्यांनी लॉकडाऊन काळातही चिकाटीने सकारात्मकतेला चालना दिली आणि मागील वर्षभरात अनेक स्पर्धांमध्ये बाजी मारली. ठाणे आणि नवी मुंबईतील युरो स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, सामान्य ज्ञान, क्रीडा, सामाजिक कार्यांसाठी क्राऊड फंडिंग अशा विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत प्रेरणादायी कार्य केले.
ठाणे येथील ओम भगत, याने सिल्व्हरलाइन इंटरनॅशनल ऑलिम्पियाड ऑफ सायन्स २०२०-२१ मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तर अगम बेहेडेने 31 जानेवारी 2021 रोजी झालेल्या राज्य स्तरीय अबॅकस स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
तसेच ऐरोली येथील वेदांत गुप्ताने LogIQids लॉजिकल रीझनिंग ऑलिम्पियाड 2020 मध्ये राज्यात पहिला क्रमांक पटकावला. तर राघव संजीवने स्टेट लेव्हल स्पेल बी लँग्वेज फॉर लाईफमध्ये यश मिळवले ऐरोली येथील राधिका देवरे आणि अदिती मल्ल्या यांनी क्राऊड फंडिंग मोहिमेतून 2.5 दशलक्ष रुपयांचा निधी गोळा केला आहे. मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमधील गरीब महिला आणि मुलींना या निधीतून स्वच्छता किट्स पुरवले जाणार आहेत.
या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल युरोस्कुल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देशपांडे यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. "विद्यार्थ्यांना त्यांच्या असलेल्या प्रतिभा कळाव्यात आणि त्यानुसार त्यांनी आपल्या कौशल्यांना चालना द्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न असतो. संकटकाळातही शैक्षणिक पातळीवर उत्तम कामगिरी करून आणि शिक्षणबाह्य स्पर्धा आणि उपक्रमांमध्ये सहभागी होऊन त्याचा आनंद घेतला. लॉक डाऊन काळात शिक्षक आणि शाळेच्या शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी घेतलेल्या मेहनीतचे फळ म्हणजे विद्यार्थ्यांचे हे यश असे कौतुक देशपांडे यांनी केले. आभासी शिक्षण काळात विद्यार्थ्यांना सक्रिय ठेवण्यासाठी पालकांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. शाळेला हे यश मिळवून दिल्याबद्दल आम्ही विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन करतो असेही देशपांडे यावेळी म्हणाले.