सीईटीचा अभ्यासक्रम जाहीर, ८ विषयांच्या अभ्यासाची दिशा मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 07:54 AM2022-12-20T07:54:53+5:302022-12-20T07:55:47+5:30
उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या आठ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक सीईटीचा अभ्यासक्रम जाहीर करण्यात आलाय.
मुंबई : उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी २०२३- २४ या शैक्षणिक वर्षांच्या प्रवेशासाठी उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या आठ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक सीईटीचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार विधीसाठी १५०, बीएड्-एमएड् १५०, बीएड्- एमएड् आणि बीपीएड्-एमपीएड्साठी १०० गुणांची परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी सीईटी घेण्यात येते. तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या सीईटी बीपीएड्-एमपीएड्साठी परीक्षांचा अभ्यासक्रम आणि गुणांचे निकष नुकतेच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलमार्फत जाहीर करण्यात आले होते.
उच्च शिक्षण विभागाने ८ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गुण आणि निकष जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षांच्या तयारीसाठी दिशा मिळणार आहे. उच्च शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या निकषांनुसार, विधी तीन आणि पाच वर्षे अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा १५० गुणांची होणार आहे. त्यासाठी विषय सारखे असले १०० गुणांची एमएड् तसेच बीएड्-एमएड् तरी गुणांचे ‘’वेटेज’’ मात्र वेगवेगळे देण्यात आले आहे.
- बीपीएड् आणि एमपीएड्साठी लेखी ५० गुणांची आणि शारीरिक चाचणी ५० अशा १०० गुणांची परीक्षा होणार आहे. बीए-बीएड्, बीएस्सी-बीएड्, बीएड्साठी १०० गुणांची परीक्षा होणार आहे.
- बीएड् इंग्लिश लँग्वेज कंटेट टेस्ट अर्थात ईएलसीटी ही परीक्षा ५० गुणांची होणार आहे, तर एकात्मिक अभ्यासक्रमासाठी १०० गुणांची सीईटी होणार आहे. संबंधित अभ्यासक्रमांची परीक्षा ऑनलाइन स्वरूपात राहणार आहे. परीक्षेत निगेटिव्ह गुण पद्धत राहणार नाही. तसेच साधारणपणे एका प्रश्नासाठी एक गुण अशा पद्धतीचे प्रश्नांचे स्वरूप राहणार आहे.