Teacher: ‘आपले गुरुजी’ विरोधात शिक्षकांच्या काळ्या फिती, फोटो लावण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 09:14 AM2022-08-30T09:14:33+5:302022-08-30T09:14:54+5:30

Teacher: ‘आपले गुरुजी’ मोहिमेअंतर्गत वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याचा निर्णय रद्द करण्याच्या विरोधात शिक्षक भारतीच्या वतीने काळ्या फिती लावून काम करण्याचे आवाहन शिक्षकांना करण्यात आले होते.

Teacher: Demand cancellation of the decision to put black ribbons and photos of teachers against 'Apale Guruji' | Teacher: ‘आपले गुरुजी’ विरोधात शिक्षकांच्या काळ्या फिती, फोटो लावण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी

Teacher: ‘आपले गुरुजी’ विरोधात शिक्षकांच्या काळ्या फिती, फोटो लावण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी

googlenewsNext

मुंबई : ‘आपले गुरुजी’ मोहिमेअंतर्गत वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याचा निर्णय रद्द करण्याच्या विरोधात शिक्षक भारतीच्या वतीने काळ्या फिती लावून काम करण्याचे आवाहन शिक्षकांना करण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी राज्यभर बहुसंख्य शाळांमध्ये शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम केले. या विषयावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना ई-मेल पाठवण्यात आल्याची माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.

शिक्षण आयुक्तांनी राज्यातील शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक यांना ‘ए फॉर साईज पेपर’वर शिक्षकांचे वर्गात फोटो लावण्याचे आदेश दिलेले आहेत. पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांबद्दल अपमानजनक वक्तव्य केले आहे. या दोन्ही घटना समाज व्यवस्थेतील शिक्षकांच्या सन्मानाला धक्का देणाऱ्या आहेत. सरकारी पातळीवर शिक्षकांना जाणीवपूर्वक बदनाम करून अनुदानित शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा तीव्र निषेध करण्यासाठी शिक्षक भारतीच्या सर्व राज्य कार्यकारिणी सदस्य आणि जिल्हाध्यक्ष यांची बैठक पार पडली. या बैठकीत सोमवारी काळ्या फिती लावून काम करण्याचा तसेच सर्व शिक्षणाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

हा तर शिक्षकांचा अपमान
विद्यार्थ्यांच्या उत्तम शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षकांच्या काम आणि अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी सरकारी स्तरावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. शिक्षकांनी चांगल्या प्रकारचे काम केले किंवा नाही, याबाबतचे मूल्यमापन वस्तुनिष्ठ स्वरूपात व्हावे, त्यासाठी पर्यवेक्षकीय यंत्रणांना अधिक सक्षम करायला हवे, असे मत शिक्षक मांडत आहेत.  ९९.९९ टक्के शिक्षक प्रामाणिकपणे काम करीत असून, केवळ अपवादात्मक प्रकरणात कामचुकारपणा करणाऱ्या काही शिक्षकांमुळे सर्वांना जबाबदार धरणे न्यायोचित होणार नाही, अशा प्रतिक्रिया शिक्षकांमधून उमटत आहेत. दोषी शिक्षकांवर होणाऱ्या कारवाईचे कोणीही समर्थन करणार नाही, असे शिक्षक भारतीने स्पष्ट केले.  

 

Web Title: Teacher: Demand cancellation of the decision to put black ribbons and photos of teachers against 'Apale Guruji'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.