राज्यातील १६ सीईटींच्या तात्पुरत्या तारखा जाहीर; सीईटी सेलच्या वेबसाईटवर करा अर्ज नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 05:48 AM2024-01-13T05:48:46+5:302024-01-13T05:50:49+5:30
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या १६ सीईटींकरिता ऑनलाइन नोंदणी सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य सरकारच्या ‘सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा’तर्फे (सीईटी सेल) २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या १६ सीईटींकरिता ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. सीईटी सेलने या परीक्षांच्या तात्पुरत्या तारखाही जाहीर केल्या आहेत. सीईटी सेलच्या www.mahacet. org संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करता येईल. बीएड, एमएड (तीन वर्षांचा इंटिग्रेटेड), एमएड, एमपीएड, बीपीएड, बीएड (जनरल आणि स्पेशल) आणि बीएड ईएलसीटी, एलएलबी ( तीन वर्षे), बीए-बीएस्सी व बीएड, एमबीए, एमएमएस, एम एमआर्क, एम एचएमसीटी, एमसीए, बी डिझाईन, बी एचएमसीटी या सीईटींकरिता नोंदणी सुरू झाली आहे. १६ जानेवारीपासून एमएचटी-सीईटीकरिता नोंदणी सुरू होईल. तर १८ जानेवारीपासून एलएलबी (पाच वर्षे) या सीईटीकरिता नोंदणी सुरू होईल. तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी सीईटीचे शुल्क कमी करण्यात आले आहे.
कोणत्या दिवशी काय?
एमएचटी सीईटी (पीसीबी) - १६ ते २३ एप्रिल
एमएचटी सीईटी (पीसीएम) - २५ ते ३० एप्रिल
बी एचएमसीटी सीईटी - १३ एप्रिल
बी डिझाईन - ६ एप्रिल
एमसीए - १४ मार्च
एम-एचएमसीटी आणि एम आर्क - ११ मार्च
एमबीए आणि एमएमएस - ९ आणि १० मार्च
एलएलबी (पाच वर्षे) - ३ मे
बीएड, एमएड (तीन वर्षांचा इंटिग्रेटेड) आणि एमएड - २ मार्च
एमपीएड - ३ मार्च
बीपीएड - ७ मार्च
बीएड (जनरल आणि स्पेशल) आणि बीएड ईएलसीटी - ४ ते ६ मार्च
एलएलबी ( तीन वर्षे) - १२ आणि १३ मार्च
बीए-बीएस्सी व बीएड - २ मे