TET Validity: लाखो शिक्षकांसाठी मोठी बातमी! टीईटी पास सर्टिफिकेट लाईफटाईम वैध राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 03:12 PM2021-06-03T15:12:04+5:302021-06-03T15:12:57+5:30

Good news for Teachers, TET Certificate Validity extended: आधीच्या नियमानुसार 7 वर्षांच्या आतच तो उमेदवार शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज करू शकत होता. ती मुदत संपल्यावर पुन्हा टीईटी परीक्षा देणे बंधनकारक होते. आता हे टेन्शन मिटले आहे.

TET Certificate Lifetime Validity: validity period of Teachers Eligibility Test qualifying certificate extended | TET Validity: लाखो शिक्षकांसाठी मोठी बातमी! टीईटी पास सर्टिफिकेट लाईफटाईम वैध राहणार

TET Validity: लाखो शिक्षकांसाठी मोठी बातमी! टीईटी पास सर्टिफिकेट लाईफटाईम वैध राहणार

googlenewsNext

TET Lifetime Validity news update:  सरकारी शिक्षक बनण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतू वशिलेबाजी आणि दर्जेदार शिक्षकांचा अभाव यामुळे केंद्र सरकारने शिक्षकांसाठी टीईटी (TET) परीक्षा पास होणे अनिवार्य केले होते. केंद्र सरकारने देशभरातील शिक्षकांना आणि इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. (validity period of Teachers Eligibility Test (TET) qualifying certificate extended from 7 years to lifetime with retrospective effect from 2011: Ministry of Education)


केंद्र सरकारने शिक्षक पात्रता परीक्षेची 7 वर्षांची वैधता संपुष्टात आणली होती. शिक्षक किंवा इच्छुक उमेदवार एकदा का टीईटी परीक्षा पास झाला की, त्याचे ते प्रमाणपत्र सात वर्षेच वैध होते. ही मुदत संपवून केंद्र सरकारने एकदा परीक्षा पास झाला की टीईटी प्रमाणपत्र आयुष्यभरासाठी वैध करण्याचा निर्णय (TET Certificate Lifetime Validity) घेतला आहे. महत्वाचे म्हणजे हा निर्णय 2011 पासून लागू करण्यात येणार असल्याने लाखो शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


शिक्षण मंत्रालयाने (Education Ministry) आज याची घोषणा केली. शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, टीचर इलिजिबिलीटी टेस्ट (Teachers Eligibility Test) ची वैधता आता लाईफटाईम असणार आहे. म्हणजेच ज्या उमेदवारांना 2011 मध्ये टीईटी पास केली आहे, तर त्यांचे सर्टिफिकेट आयुष्यभरासाठी वैध असणार आहेत. 



सरकारी शाळांमध्ये किंवा अनुदानित शाळांमध्ये शिक्षकाची नोकरी मिळवायची असेल तर टीईटी परीक्षा पास होणे गरजेचे आहे. तसेच जे शिक्षक नोकरी करतात त्यांनाही टीईटी पास होणे गरजेचे आहे. आधीच्या नियमानुसार 7 वर्षांच्या आतच तो उमेदवार शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज करू शकत होता. ती मुदत संपल्यावर पुन्हा टीईटी परीक्षा देणे बंधनकारक होते. आता हे टेन्शन मिटले आहे.
 

Read in English

Web Title: TET Certificate Lifetime Validity: validity period of Teachers Eligibility Test qualifying certificate extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.