दहावीची परीक्षा संपली, आता अकरावी प्रवेशासंदर्भात पुढच्या आठवड्यात सूचना!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 06:30 AM2022-04-09T06:30:54+5:302022-04-09T06:31:06+5:30

दहावीची परीक्षा संपली असून, आता विद्यार्थी-पालकांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत. पण अकरावीच्या प्रवेशाबाबत कोणतीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आली नव्हती.

The 10th exam is over now next week regarding the 11th admission | दहावीची परीक्षा संपली, आता अकरावी प्रवेशासंदर्भात पुढच्या आठवड्यात सूचना!

दहावीची परीक्षा संपली, आता अकरावी प्रवेशासंदर्भात पुढच्या आठवड्यात सूचना!

googlenewsNext

मुंबई :

दहावीची परीक्षा संपली असून, आता विद्यार्थी-पालकांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत. पण अकरावीच्या प्रवेशाबाबत कोणतीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आली नव्हती. पण आता निकालाच्या आधीच्या सुटीत अकरावी प्रवेशाचा अर्ज भरण्याचा सराव विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील उपसंचालक विभागांना याबाबत सूचना देण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली आहे. 

दरवर्षी अकरावी प्रवेश प्रक्रिया कशी राबवावी? विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची सराव प्रक्रिया व मूळ प्रक्रिया कधी घ्यावी, यासंदर्भातील सूचना दहावी परीक्षा संपण्याआधीच उपसंचालक कार्यालयांना दिल्या जातात. त्यानुसार उपसंचालक कार्यालयाकडून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून तयारी करून घेतली जाते. अनेक विद्यार्थी प्रवेशातील अर्धवट माहितीमुळे प्रवेशापासून दूर राहतात. त्यामुळे या सराव अर्जाची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते. मात्र यंदा अद्यापही उपसंचालक कार्यालये शिक्षण संचालनालयाकडून सूचनांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र ही प्रतीक्षा लवकरच संपणार असून, अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे पाठविला असल्याची माहिती शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.

१६ एप्रिलपासून प्रक्रियेला सुरुवात
पहिल्या टप्प्यात नोंदणी आणि अर्ज भरण्याचा सराव अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात राज्यस्तरावर एक बैठक झाली आहे. त्या बैठकीनंतर प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यानंतर पहिल्या टप्प्यात जागांची नोंदणी, त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्याची संधी दिली जाणार आहे. येत्या १६ एप्रिलपासून सुरुवात केली जाईल. यामुळे सुटीच्या काळात विद्यार्थ्यांना अर्ज भरता येईल, अशी माहिती माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.

Web Title: The 10th exam is over now next week regarding the 11th admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :ssc examदहावी