"रोज 10 तास अभ्यास अन् प्रत्येक विषयाचे 50 प्रश्न"; JEE Advance मध्ये तिसरा आलेल्या थॉमसने सांगितलं यशाचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 06:39 PM2022-09-13T18:39:24+5:302022-09-13T18:49:02+5:30

JEE Advanced 2022 Thomas Biju Cheeramvelil : JEE Advanced 2022 परीक्षेत थॉमस बीजू चीरमवेलील याने असंच घवघवीत यश संपादन केलं आहे. देशात तिसरा रँक मिळवला आहे.

Thomas Biju Cheeramvelil got All India Rank 03 in JEE Advanced 2022 | "रोज 10 तास अभ्यास अन् प्रत्येक विषयाचे 50 प्रश्न"; JEE Advance मध्ये तिसरा आलेल्या थॉमसने सांगितलं यशाचं रहस्य

"रोज 10 तास अभ्यास अन् प्रत्येक विषयाचे 50 प्रश्न"; JEE Advance मध्ये तिसरा आलेल्या थॉमसने सांगितलं यशाचं रहस्य

googlenewsNext

इच्छाशक्ती आणि स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असेल तर अनेक गोष्टी या सहज शक्य होतात. याच्याच जोरावर लोक आपल्या यशाची गाथा रचतात. JEE Advanced 2022 परीक्षेत थॉमस बीजू चीरमवेलील याने असंच घवघवीत यश संपादन केलं आहे. देशात तिसरा रँक मिळवला आहे. थॉमसने परीक्षेची तयारी नेमकी कशी केली, यशाच्या दिशेने त्याचा हा प्रवास कसा होता, त्याच्या यशाचं रहस्य काय? याबद्दल माहिती दिली आहे. 

थॉमसने आपल्या यशाचं श्रेय पालकांना आणि MATHIIT ला दिलं आहे. "परीक्षेसाठी तयारी करताना सर्वात आधी फंडामेंटल कॉन्सेप्ट नीट शिकून घेतल्या पाहिजेत. त्यानंतर वेगवेगळे प्रश्न सोडवले पाहिजेत. यामध्ये आपलं नेमकं काय चुकलं ते समजून घ्या आणि पुन्हा त्या चुका होणार नाहीत याची काळजी घ्या... सहा ते आठ तासांची नीट झोप आवश्यक आहे, अभ्यासात सातत्य राखा, शॉर्टकट वापरू नका, प्रॅक्टिस असणं अत्यंत गरजेचं आहे" असा सल्ला त्याने जेईई परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना दिला आहे. 

"दररोज जवळपास 10 तास अभ्यास करायचो"

"दहावीत असतानाच विविध परीक्षांसाठी अभ्यास सुरू केला होता, तशी तयारी केली. दहावीनंतर प्रामुख्याने जेईईसाठी अभ्यास सुरू केला. कोरोना काळात ऑनलाईन क्लास असायचे त्यावेळी ज्या काही शंका असायच्या त्या Whatsapp च्या माध्यमातून सरांना विचारत होतो. मी दररोज प्रत्येक विषयाचे 50 प्रश्न सोडवत होतो, दररोज जवळपास 10 तास अभ्यास करायचो. जर तुम्ही सलग दोन वर्ष अभ्यास करत असाल तर कमी वेळ झोपण्याची गरज नाही, पुरेशी झोप घ्या" असं म्हटलं आहे. 

"परीक्षेची तयारी करताना आईने खूप जास्त मदत"

थॉमस बीजू चीरमवेलील याने परीक्षेची तयारी करताना आईने खूप जास्त मदत केल्याचं सांगितलं. तिने लायब्ररीमधली अनेक पुस्तकं आणून दिली, खूप गोष्टी शिकवल्याचं म्हटलं आहे. तसेच माझ्या यशात MATHIIT चा सिंहासा वाटा आहे. मी 2019 पासून येथे शिक्षण घेतोय. याच दरम्यान मला Olympiads, KVPY आणि NTSE या परीक्षेत चांगलं यश मिळालं. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्याचं देखील थॉमसने म्हटलं आहे. 
 

Web Title: Thomas Biju Cheeramvelil got All India Rank 03 in JEE Advanced 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.