TMC Recruitment 2021: अधिकारी पदासह अनेक पदांवर होतेय भरती, 40 हजार रुपयांपर्यंत मिळेल सॅलरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 08:06 PM2021-12-19T20:06:13+5:302021-12-19T20:06:31+5:30
सायंटिफिक ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचेवय 35 वर्षांपेक्षा कमी असावे. तसेच टेक्निशियन 'सी' पदासाठी उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा कमी असावे. टेक्निशियन 'ए' पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 27 वर्षांपेक्षा कमी असावे.
टाटा मेमोरियल सेंटर (TMC)ने तंत्रज्ञ 'C', तंत्रज्ञ 'A' आणि सायंटिफिक ऑफिसर, अशा एकूण 13 पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 21, 23 आणि 27 डिसेंबर 2021 रोजी नियोजित वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये सहभागी होऊ शकतात. (TMC Recruitment 2021)
रिक्त पदे अशी -
अॅडहॉक सायंटिफिक ऑफिसर 'सी' (हेमेटोपॅथॉलॉजी) - 02
अॅडहॉक टेक्निशियन 'सी' (मायक्रोबायोलॉजी) - 05
अॅडहॉक टेक्निशियन 'सी' (हेमेटोपॅथोलॉजी) - 04
अॅडहॉक टेक्नीशियन 'ए' (पॅथॉलॉजी) - 02
शैक्षणिक आर्हता -
टेक्निशियन पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून 12वी पास असावा. तसेच डिप्लोमा आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव असावा. शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण तपशीलांसाठी, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहावी.
वॉक-इन-इंटरव्ह्यूची तारीख -
21 डिसेंबर 2021 - अॅडहॉक सायंटिफिक ऑफिसर 'सी' (हेमेटोपॅथोलॉजी) पोस्ट.
23 डिसंबर 2021- अॅडहॉक टेक्नीशियन 'सी' (मायक्रोबायोलॉजी) आणि अॅडहॉक टेक्निशियन 'सी' (हेमेटोपॅथॉलॉजी) पोस्ट.
27 डिसेंबर 2021- अॅडहॉक टेक्निशियन 'ए' (पॅथोलॉजी) पोस्ट.
सायंटिफिक ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचेवय 35 वर्षांपेक्षा कमी असावे. तसेच टेक्निशियन 'सी' पदासाठी उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा कमी असावे. टेक्निशियन 'ए' पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 27 वर्षांपेक्षा कमी असावे.
सायंटिफिक ऑफिसर पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 40 हजार रुपये प्रतिमाह एवढी सॅलरी मिळेल. टेक्निशियन 'सी' पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 20 हजार रुपये, टेक्निशियन 'ए' पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 18,564 रुपये एवढा पगार मिळेल. या पदांसाठी वॉक इन इंटरव्ह्यूच्या माध्यमाने उमेदवारांची निवड होईल. उमेदवारांना त्यांचा अर्ज 20 डिसेंबरपर्यंत सादर करता येईल.
अधिकृत नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा.