यंदाचे शैक्षणिक वर्ष १ ऑक्टोबरपासून सुरू करा; यूजीसीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 05:16 AM2021-07-18T05:16:40+5:302021-07-18T05:18:33+5:30

नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पदवी  अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून अभ्यासक्रमांचे वर्ग १ ऑक्टोबरपासून सुरू करावेत, असे आदेश यूजीसीने विद्यापीठे, महाविद्यालयांना दिले आहेत.

ugc gave orders to start this academic year from 1st october | यंदाचे शैक्षणिक वर्ष १ ऑक्टोबरपासून सुरू करा; यूजीसीचे आदेश

यंदाचे शैक्षणिक वर्ष १ ऑक्टोबरपासून सुरू करा; यूजीसीचे आदेश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : कोरोनाची साथ सुरू असल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी जाहीर केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पदवी  अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून अभ्यासक्रमांचे वर्ग १ ऑक्टोबरपासून सुरू करावेत, असे आदेश यूजीसीने विद्यापीठे, महाविद्यालयांना दिले आहेत. या शैक्षणिक वर्षासाठीचे वेळापत्रकही जाहीर केले. यूजीसीने म्हटले आहे की, नवे शैक्षणिक वर्ष लवकर सुरू करण्यास विद्यापीठ, महाविद्यालयांनी प्रयत्न करावा. कोरोना स्थितीचा विचार करून त्या परिसरातील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन की ऑफलाइन शिक्षण द्यायचे याचा निर्णय घ्यायचा आहे. काही विद्यापीठांनी अद्याप २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांच्या परीक्षा घेतलेल्या नाहीत. या परीक्षा घेणे सर्व महाविद्यालये, विद्यापीठांना बंधनकारक आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात अंतिम सहामाही परीक्षा किंवा अंतिम वर्षांची परीक्षा या लेखी किंवा ऑनलाइन पद्धतीने येत्या ३१ ऑगस्टपूर्वी घ्याव्यात.

मास्क घालणे गरजेचे

कोरोना साथीचा आणखी फैलाव होऊ नये म्हणून केंद्र व विविध राज्य सरकारांनी काही उपाययोजना केल्या आहेत. देशात लसीकरण सुरू असले तरी लोकांनी मास्क घालणे, शारीरिक अंतर राखणे आवश्यक आहे. त्या नियमांचे पालन करूनच विविध विद्यापीठे, महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करावे, असेही यूजीसीने एका निवेदनात म्हटले आहे.

Web Title: ugc gave orders to start this academic year from 1st october

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.