UPSC 2023 मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; असा करा चेक...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 07:23 PM2023-12-08T19:23:36+5:302023-12-08T19:23:48+5:30
UPSC CSE Mains Result 2023: मुख्य परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
UPSC CSE Mains Result 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा मुख्य परीक्षा 2023 (UPSC CSE Mains 2023) चा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेत बसलेले उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाहीर झालेला निकाल पाहू शकतात. मुख्य परीक्षा 15 सप्टेंबर 2023 ते 24 सप्टेंबर 2023 दरम्यान देशभरातील केंद्रांवर झाली होती.
Civil Services (Main) Examination, 2023
— Union Public Service Commission (UPSC) (@upsc_official) December 8, 2023
Written Result
Details: https://t.co/0xfBveaDYP#UPSChttps://t.co/iWWV77PeZg
मुख्य परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना आता मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुख्य निकाल आणि मुलाखतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार UPSC ने जारी केलेली नोटीस पाहू शकतात. मुलाखतीत पास झालेल्या उमेदवारांचे मुलाखत आणि मुख्य परीक्षेच्या गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.
निकाल कसा पाहावा?
1.UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्या.
2. मेन पेजवर UPSC मेन्स रिजल्ट 2023 लिंकवर क्लिक करा.
3. एक नवीन PDF फाईल उघडेल, तिथे उमेदवार त्यांचा रोल नंबर पाहू शकतात.
4. फाईल डाउनलोड करा आणि पुढील गरजांसाठी तिची हार्ड कॉपी ठेवा.
UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा 15 ते 24 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती. 28 उमेदवारांचे निकाल प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांमुळे रोखण्यात आले आहेत. सर्व उमेदवारांच्या गुणपत्रिका 15 दिवसांच्या आत आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड केल्या जातील आणि 30 दिवस वेबसाइटवर उपलब्ध असतील. मुख्य परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना DAF II फॉर्म सबमिट करावा लागेल, फॉर्म UPSC वेबसाइटवर उपलब्ध आहे.