UPSC Result 2021: 'यूपीएससी'चा निकाल जाहीर, श्रुती शर्मा देशात पहिली, महाराष्ट्रातून प्रियंवदा म्हाडदळकरची बाजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 02:42 PM2022-05-30T14:42:23+5:302022-05-30T14:54:45+5:30
यूपीएससी फायनलचा निकाल (UPSC Result 2021) जाहीर झाला असून मुलींनी बाजी मारली आहे.
नवी दिल्ली-
यूपीएससी फायनलचा निकाल (UPSC Result 2021) जाहीर झाला असून मुलींनी बाजी मारली आहे. देशात पहिल्या तीन क्रमांकावर मुलीच आहेत. श्रुती शर्मा (Shruti Sharma UPSC Topper) देशात पहिली आली आहे. तर अंकिता अग्रवाल आणि गामिनी सिंगला यांनी अनुक्रमे दुसरा व तिसऱ्या क्रमांक पटकावला आहे. देशात यंदा यूपीएससीमध्ये एकूण ७४९ उमेदवार यशस्वी ठरले आहेत.
UPSC declares 2021 Civil Services Exam results
— ANI (@ANI) May 30, 2022
Shruti Sharma, Ankita Agarwal and Gamini Singla secure top three ranks, respectively pic.twitter.com/b0x9N0IomU
महाराष्ट्रातून प्रियंवदा अशोक म्हाडदळकर ही पहिली आली आहे. तिची ऑल इंडिया रँक १३ आहे. टॉप-१५ मध्ये देसणारं हे एकमेव मराठी नाव आहे. यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर upsc.gov.in येथे निकाल पाहता येईल. उमेदवारांचे वैयक्तिक गुण निकालानंतर १५ दिवसांनी जाहीर करण्यात येणार आहेत. आयोगाने १७ मार्च रोजी नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२१ आयोजित केली होती. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती ५ एप्रिल ते २६ मे २०२२ या कालावधीत घेण्यात आल्या. या परीक्षेच्या माध्यमातून नागरी सेवेतील ७१२ पदे भरली जाणार आहेत.