UPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, या लिंकवर क्लिक करुन तपासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 08:20 PM2024-12-09T20:20:11+5:302024-12-09T20:20:40+5:30
UPSC Result : UPSC मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
UPSC Result : केंद्रीय लोकसेवा आयोग, म्हणजेच UPSC ने आज(9 डिसेंबर) नागरी सेवा मुख्य परीक्षा (CSE Mains) चा निकाल जाहीर केला. UPSC मुख्य परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांना UPSC च्या अधिकृत upsc.gov.in आणि upsconline.nic.in या वेबसाइटवर निकाल पाहता येईल. UPSC मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. जो उमेदवार मुलाखतीत उत्तीर्ण होईल, त्याची IAS, IPS, IFS सह विविध सेवांसाठी निवड केली जाईल.
UPSC परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते, ज्यामध्ये प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचा समावेश होतो. यावर्षी UPSC नागरी सेवा पूर्वपरीक्षा 16 जून रोजी तर मुख्य परीक्षा 20, 21, 22, 28 आणि 29 सप्टेंबर रोजी घेण्यात आली होती.
UPSC मुख्य निकाल 2024: निकाल कसा तपासायचा?
सर्व प्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.
त्यानंतर होमपेजवरील ‘Whats New’ वर क्लिक करा.
त्यानंतर UPSC CSE मुख्य निकाल 2024 डाउनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
लिंक ओपन केल्यानंतर तुमच्या रोल नंबरच्या मदतीने निकाल तपासू शकता.
13 ते 19 डिसेंबर दरम्यान मुलाखतीसाठी फॉर्म भरा
या परीक्षेद्वारे UPSC एकूण 1 हजार पदांसाठी अधिकाऱ्यांची भरती करणार आहे. कट-ऑफ गुणांपेक्षा जास्त गुण मिळवणारे उमेदवार भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय विदेश सेवा (IFS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि इतर केंद्रीय सेवा आणि पदांवर भरतीसाठी पात्र असतील. या मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व उमेदवारांना 13 ते 19 डिसेंबर दरम्यान त्यांचा तपशीलवार अर्ज-II (DAF-II) भरावा लागेल.