नोकरीसोबत UPSC चा अभ्यास कसा करावा? IFS अधिकाऱ्याने सांगितल्या 5 गोल्डन टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 09:47 PM2023-12-05T21:47:32+5:302023-12-05T21:48:08+5:30
UPSC preparation with job: फुल टाइम नोकरी सोबत UPSC चा अभ्यास अवघड आहे, पण या टीप्स फॉलो करुन तुम्ही परीक्षा पास होऊ शकता.
UPSC preparation with job:केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा देशात सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात, पण मोजकेच पास होतात. यूपीएससी परीक्षेचे तीन टप्पे असतात. आधी प्रिलिम्स, मग मेन आणि शेवटी मुलाखत. अनेकजण वर्षानुवर्षे कोचिंग घेतात, पण ही परीक्षा पास होऊ शकत नाहीत.
अनेकजण नोकरी करताना अभ्यास करतात, पण त्यांनाही अपयशाचा सामना करावा लागतो. पूर्णवेळ नोकरीसोबत अभ्यास करणे मोठे आव्हान आहे. या समस्येवर IFS अधिकारी हिमांशू त्यागी यांनी उपाय दिला आहे. नोकरी करताना UPSC परीक्षेची तयारी कशी करावी, यासाठी त्यांनी पाच पॉईंट दिले आहेत.
Golden tips from my UPSC prep and full-time job saga:
— Himanshu Tyagi IFS (@Himanshutyg_ifs) December 2, 2023
- Wake up at 3:30 am and study for 4 hours.
- Study for 1/2 hr in the evening after office.
- Watch study videos while travelling to the workplace.
- Keep study material on mobile/PC, Study in every small break you get at…
- सकाळी 3.30 वाजता उठून चार तास अभ्यास करा.
- नोकरी संपल्यानंतर अर्धा तास वाचण करा.
- प्रवासाच्या वेळेचा योग्य वापर करा आणि या काळात अभ्यास करा.
- तुमच्या फोन आणि लॅपटॉपमध्ये अभ्यासाचे साहित्य ठेवा, जेणेकरून तुम्हाला ऑफिसमध्ये वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करता येईल.
- वीकेंडला दहा तास अभ्यास करा.
- हे वेळापत्रक एक ते दोन वर्षे सतत पाळा.
आता या पाच पॉईंटवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांना या टिप्स फायदेशीर वाटत आहेत, तर काहींना हे अशक्य वाटत आहे. एका यूजरने कमेंट केली, 'मला एक प्रश्न आहे, सकाळी 3.30 वाजता उठल्यानंतर मी दिवसभर ऑफिसमध्ये अॅक्टिव्ह राहू शकेन का? मला दिवसभर थकवा जाणवणार नाही का?' दुसरा युजर म्हणाला, 'मी कंपनीत डेव्हलपर म्हणून काम करतो, मला ऑफिसच्या कामासाठीही अभ्यास करावा लागतो. एखादा सोपी नोकरी करणारा व्यक्तीच हे काम करू शकेल.'