डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 02:42 PM2024-09-23T14:42:48+5:302024-09-23T14:43:06+5:30
युक्रेन युद्धावेळी तिकडे वैद्यकीय शिक्षण घ्यायला गेलेले अनेक विद्यार्थी अडकले होते. आताही युक्रेन धगधगत आहे. यामुळे परदेशात कमी पैशांत शिक्षण घेण्यासाठी आणखी काही पर्याय आहेत.
भारतातच नाही तर जगभरात डॉक्टरांची प्रचंड टंचाई आहे. देशात एमबीबीएसच्या जागा फुल झाल्या आहेत. अनेक ठिकाणी फी आणि डोनेशनच एवढे असते की सामान्य लोक, मध्यम वर्गातील विद्यार्थी डॉक्टर होऊच शकत नाहीत. अशावेळी परदेशात जाऊन शिक्षण घेणे एक चांगला पर्याय आहे. युक्रेन युद्धावेळी तिकडे वैद्यकीय शिक्षण घ्यायला गेलेले अनेक विद्यार्थी अडकले होते. आताही युक्रेन धगधगत आहे. यामुळे परदेशात कमी पैशांत शिक्षण घेण्यासाठी आणखी काही पर्याय आहेत.
या देशांत २० लाख रुपयांत एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करता येणार आहे. कझाकिस्तान हा असा देश आहे जिथे चांगल्या प्रकारचे वैद्यकीय शिक्षण दिले जाते. टॉप रँकिंग असलेल्या विद्यापीठातून ६ वर्षांच्या शिक्षणासाठी १८ लाख रुपये फी आकारली जाते.
महत्वाचे म्हणजे इथली दोन विद्यापीठे NExT एक्झिट परीक्षेच्या बॅचेस देखील ठेवतात. कझाकस्तानमध्ये एमबीबीएसनंतर भारतात वैद्यकीय प्रॅक्टिस करू इच्छिणाऱ्या तरुणांना परवाना परीक्षेत सहज यश मिळू शकते. येथील टॉपच्या ७ विद्यापीठांत भारताचे ८० टक्के मेडिकलचे विद्यार्थी शिकत आहेत.
कझाकिस्तानमध्ये कोक्शेताउ स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी, कैस्पियन मेडिकल यूनिवर्सिटी मध्ये NExT एक्झिट परीक्षेची तयारीही करून घेतली जाते. कजाख राष्ट्रीय यूनिवर्सिटी, साउथ कजाखस्तान मेडिकल अकादमी, अस्ताना स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी, अल फराबी कजाख यूनिवर्सिटी अशी सात विद्यापीठे आहेत. इथे प्रवेश घेण्यासाठी दोन महत्वाच्या अटी आहेत. पहिली १२ वीमध्ये किमान ५० टक्के मार्क आणि दुसरी म्हणजे कितीही मार्क पडलेले असले तरी भारतातील NEET-UG परीक्षा देणे आवश्यक आहे.