परीक्षेत उत्तम स्कोअर करायचा आहे? ह्या काही टिप्स आपल्याला उपयोगी पडतील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 06:12 PM2022-04-07T18:12:02+5:302022-04-07T18:14:32+5:30

कोणत्याही स्तरावरच्या परीक्षेमुळे खूप ताण होऊ शकतो. परीक्षांमध्ये उत्तम प्रदर्शन करण्याची गुरुकिल्ली स्मार्ट व योग्य प्रकारे केलेला अभ्यास आहे ज्यामुळे आपल्या प्रयत्नांमुळे लक्षवेधी प्रदर्शन आपण देऊ शकता.

Want to score better in the exam? Here are some tips to help you | परीक्षेत उत्तम स्कोअर करायचा आहे? ह्या काही टिप्स आपल्याला उपयोगी पडतील

परीक्षेत उत्तम स्कोअर करायचा आहे? ह्या काही टिप्स आपल्याला उपयोगी पडतील

Next

(Image Credit : Social Media)

कोणत्याही स्तरावरच्या परीक्षेमुळे खूप ताण होऊ शकतो. परीक्षांमध्ये उत्तम प्रदर्शन करण्याची गुरुकिल्ली स्मार्ट व योग्य प्रकारे केलेला अभ्यास आहे ज्यामुळे आपल्या प्रयत्नांमुळे लक्षवेधी प्रदर्शन आपण देऊ शकता. स्मार्ट अभ्यास करायचा असेल तर कसे शिकावे, हे शिकण्याची महत्त्वपूर्ण पद्धत शिकावी लागते. कसे समजून घ्यावे, कसे जलद शिकावे आणि आधी शिकून घेतलेली माहिती दीर्घ काळ प्रभावी प्रकारे कशी टिकवावी, ह्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे आणि आवश्यक असते व अनेक विद्यार्थ्यांना ते कठीण जाते. सीबीएसई परीक्षांमध्ये उत्तम स्कोअर मिळवण्याच्या 5 सोपे मार्ग असे आहेत:

फोकस ठेवा आणि दररोज अनेक विषयांची उजळणी करण्याचा प्रयत्न करा:

परीक्षेच्या आधी विद्यार्थी त्यांच्या ‘टू‌ डू’ यादीमध्ये दररोज एक विषय ठेवत असतात. एका दिवशी एकाच विषयाचा अभ्यास केल्यास तुम्ही एकाच प्रकारच्या माहितीमध्ये कन्फ्युज होण्याची शक्यता असते. म्हणून वेगाने शिकण्यासाठी, प्रत्येक विषयासाठी आपल्या अभ्यासाचा वेळ स्प्रेड करा. त्यामुळे एका किंवा दोन विषयांमध्ये खोलवर जाण्याच्या ऐवजी आपल्याला फोकस ठेवण्यासाठी मदत मिळेल.

नोटस काढा आणि त्या सतत रेफर करा:

शिकवण्याच्या- शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये काळजीपूर्वक ऐका आणि शिकवलेल्या संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाचे पॉईंटस नोट करा आणि परत एकदा ते जलद गतीने वाचा. त्यामुळे आपल्या दीर्घ कालीन स्मृतीमध्ये अधिक माहिती साठवण्यासाठी मदत मिळते.

आपण जे शिकत आहात, ते आपल्याला आधीच माहिती असलेल्या गोष्टीसोबत कनेक्ट करा:

‘मेक इट स्टिक: द सायंस ऑफ सक्सेसफुल लर्निंग’ ह्या पुस्तकामध्ये वैज्ञानिक हेन्री रोडिजर तिसरा आणि मार्क ए मॅकडॅनियल ह्यांनी असे सांगितले आहे की, आपण आपल्याला आधीच माहिती असलेल्या संकल्पनांसोबत नवीन संकल्पना जितक्या सक्षमपणे कनेक्ट करू शकू, तितकी आपण नवीन माहिती वेगाने शिकू शकू.

“आपल्या मित्राला शिकवा” पद्धत वापरून पाहा:

ही अतिशय प्रभावी पद्धत आहे ज्यामुळे आपल्या मनातील विषय स्पष्ट होतात. आपले पालक, भावंड, मित्र किंवा नातेवाईक अशा लोकांसोबत चर्चा करा आणि आपली उत्तरे त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. 

सुनियोजित (स्ट्रक्चर्ड) आणि स्पष्ट (क्रिस्प) उत्तरे लिहा. 

विद्यार्थी सामान्यत: शीर्षके, उपशीर्षके, बुलेट अशा गोष्टी वर्णनात्मक प्रश्नांच्या उत्तरांमध्ये लिहीत नाहीत. आपणे नेहमी बघितले पाहिजे की, आपल्या उत्तराची रचना उत्तम आहे आणि त्यासाठीची सर्वोत्तम पद्धत ही आहे की, उत्तर हे सुस्पष्ट, महत्त्वपूर्ण मुद्दे अधोरेखित करणारे आणि उत्तर पत्रिका स्वच्छ ठेवणारे असले पाहिजे.

विज्ञानाच्या उत्तरांच्या संदर्भात आकृत्या व्यवस्थित काढा व शक्य तिथे फ्लो चार्टस आणि आकृत्यांचा वापर करा. 

गणिताच्या उत्तरांसाठी केलेले रफ काम दिसेल ह्याची काळजी घ्या व ते उजव्या बाजूला योग्य प्रकारे एका चौकटीत ठेवा.
कृपया लक्षात घ्या की, आपल्याला एक किंवा दोन प्रश्नांची उत्तरे येत नसतील, तरीही आपण नेहमी प्रश्न पत्रिकेतील सर्व प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत, कारण योग्य मांडणी असलेल्या व पूर्ण केलेल्या उत्तरपत्रिकेला नेहमीच चांगले गुण मिळतात.

जर आपल्याला आपला पेपर वेळेवर सोडवायचा असेल, तर आपली उत्तरे लिहीताना शब्द मर्यादेच्या पुढे जाऊ नका.
लघु उत्तरे, बहुपर्यायी प्रश्न व दीर्घ उत्तरे ह्यांच्यासाठी आपल्या वेळेचे नियोजन करा. 
कृपया सुवाच्य व स्पष्ट हस्ताक्षरात लिहा.

जेव्हा आपण आपल्या परीक्षांची तयारी कराल, तेव्हा आपण दीर्घ काळ बसून अभ्यास करू नये. त्यामुळे आपण थकू शकता आणि आपण दीर्घ काळ शिकलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्यापासून चुकू शकता.

आपण 25 मिनिटे पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करा आणि त्यानंतर 5 मिनिटांचा ब्रेक घ्या. आपण ब्रेकनंतर परत अभ्यासाला बसू शकता. लक्षात ठेवा की, दिवसामध्ये 10 तासांपेक्षा जास्त वेळ अभ्यास करू नका.

भगवत् गीतेतील ओळी- “कर्मण्येsवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्मफला हेतुर् भूमातये संगोस्त्व अक्रमणि” ह्याचा अर्थ असा आहे की, आपण आपल्या क्षमतांनुसार सर्वोत्तम ते करण्याकडेच लक्ष द्या आणि परिणामांची चिंता करू नका.

आपले यश मोठ्या प्रमाणात आपल्या दृष्टीकोनावर अवलंबून असते. आपल्या विषयांबद्दल उत्साह ठेवा आणि आपण यशस्वी व्हाल आणि आपली उद्दिष्टे पूर्ण कराल, असे स्वत:ला सकारात्मक प्रकारे सांगत राहा.

आपल्याला यशासाठी शुभेच्छा!

नाव: मिस. अनिता नायर
पद: मुख्य अध्यापिका
ऑर्चिडस द इंटरनॅशनल स्कूल पुणे

Web Title: Want to score better in the exam? Here are some tips to help you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.