११ वी प्रवेशासाठी नेमकी कोण कोणती प्रमाणपत्रे लागतात? जाणून घ्या एका क्लिकवर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 07:22 AM2022-06-12T07:22:32+5:302022-06-12T07:22:47+5:30

११ वी, इंजिनीयरिंग डिप्लोमा, पदवी व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी काही महत्त्वाच्या प्रमाणपत्रांची आपण माहिती घेऊया.

What are the certificates required for admission here is the list | ११ वी प्रवेशासाठी नेमकी कोण कोणती प्रमाणपत्रे लागतात? जाणून घ्या एका क्लिकवर...

११ वी प्रवेशासाठी नेमकी कोण कोणती प्रमाणपत्रे लागतात? जाणून घ्या एका क्लिकवर...

Next

आनंद मापुस्कर, करिअर मार्गदर्शक

११ वी, इंजिनीयरिंग डिप्लोमा, पदवी व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी काही महत्त्वाच्या प्रमाणपत्रांची आपण माहिती घेऊया.

वय, अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला
इंजिनीयरिंग अभ्यासक्रमांसाठी अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल) नसले तरी चालते. त्याऐवजी १० वी व १२ वी ची परीक्षा महाराष्ट्रातून दिली असल्याचा पुरावा तसेच जन्म महाराष्ट्रात झाल्याचा पुरावा चालतो. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी मात्र अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे. 

महाराष्ट्रातील जन्म असल्यास 
- जन्मदाखला/शाळा सोडल्याचा दाखला/पासपोर्ट
-  अर्जदार १८ वर्षे पूर्ण नसल्यास वडिलांचे डोमेसाईल प्रमाणपत्र आवश्यक
-  शिधापत्रिका, लाईटबिल, ओळखपत्र, प्रतिज्ञापत्र

महाराष्ट्रातील जन्म नसल्यास
- जन्मदाखला/शाळा सोडल्याचा दाखला/पासपोर्ट
- अर्जदार १८ वर्षे पूर्ण नसल्यास वडिलांचे डोमेसाईल प्रमाणपत्र आवश्यक
- शिधापत्रिका, लाईटबिल, ओळखपत्र, प्रतिज्ञापत्र
- महाराष्ट्रात सलग १० वर्षे वास्तव्य करीत असल्याचा पुरावा उदा.
- सलग १० वर्षांचे बँक पासबुक झेरॉक्स
- सलग १० वर्षांचे लाईट बिल झेरॉक्स
- सलग १० वर्षांची शाळेतील गुणपत्रिका झेरॉक्स

उत्पन्नाचा दाखला 
आर्थिकदृष्टया मागासवर्गासाठी (ई.बी.सी.) फी माफीच्या योजना असतात. इंजिनीयरिंग अभ्यासक्रमांसाठी ट्युशन फी वेव्हर योजना, राजर्षी शाहू शिष्यवृती यासारख्या योजनांसाठी ही चालू वर्षीच्या उत्पन्नांचे प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातून घेणे आवश्यक असते. 

अर्जासोबत खालील कागदपत्रे हवीत
- रेशन कार्ड
- पॅनकार्ड / मतदार ओळखपत्र
- प्रतिज्ञापत्र
- लाईटबिल
- मुले शिकत असल्यास बोनाफाईड प्रमाणपत्र
- नोकरी करत असल्यास फॉर्म १६ ची प्रत
- स्वयंरोजगार करत असल्यास व आयकर रिटर्न भरत नसल्यास स्थानिक नगरसेवकाकडून आपल्या नावे उत्पन्नाचा दाखला घ्यावा तसेच अर्जावर तीन साक्षीदारांच्या सह्या व त्यांच्या रेशनकार्डची झेरॉक्स प्रत.

Web Title: What are the certificates required for admission here is the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.