Modi cabinet: मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; लाखो सरकारी शाळांमध्ये प्ले स्कूल उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 05:46 PM2021-08-04T17:46:23+5:302021-08-04T17:47:41+5:30
National Education Policy: आजच्या या बैठकीत सर्वांगीण शिक्षण योजनेची मुदत 2026 पर्यंत वाढविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी 2.0 असे पुढे नाव देण्यात आले आहे. यावर जवळपास तीन लाख कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यामध्ये केंद्राचा वाटा हा 1.85 लाख कोटी असेल.
मोदी मंत्रिमंडळाच्या (Modi cabinet) बैठकीत बुधवारी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये सर्वांगीण शिक्षण स्कीम 2.0 (Samagra Shiksha 2.0) लागू करणे आणि केंद्राद्वारे संचलित विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाचा कार्यकाळ आणखी दोन वर्षे वाढविण्याचा निर्णय आहे. शिक्षा योजना 2.0 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 पर्यंत लागू राहणार आहे. यासाठी 2.94 लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. (Under National Education Policy and Samagra Shiksha 2.0, formalization of playschools and anganwadi is being done )
राष्ट्रीय शिक्षण नितीनुसार (National Education Policy) सर्वांगीण शिक्षण योजना 2.0 मध्ये प्ले स्कूल आणि अंगणवाडीला औपचारिक रुप दिले जाणार आहे. सरकारी स्कूलमध्ये देखील प्ले स्कूल सुरु करण्यात येणार आहे. शिक्षकांना त्यानुसार तयार केले जाणार आहे, असे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. तर सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, फास्ट ट्रॅक कोर्टाची केंद्र सरकारच्या योजनेचा कार्यकाळ दोन वर्षांसाठी वाढविला जाणार आहे.
आजच्या या बैठकीत सर्वांगीण शिक्षण योजनेची मुदत 2026 पर्यंत वाढविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी 2.0 असे पुढे नाव देण्यात आले आहे. यावर जवळपास तीन लाख कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यामध्ये केंद्राचा वाटा हा 1.85 लाख कोटी असेल.
For the first time, govt has added child safety within the Samagra Shiksha scheme. States will be given aid to make a commission for protection of child rights: Union Education Minister, Dharmendra Pradhan pic.twitter.com/N314P200CY
— ANI (@ANI) August 4, 2021
या योजनेचा लाभ हा सरकारी अनुदान मिळणाऱ्या 11.6 लाख शाळांना होणार आहे. यामध्ये 15.6 कोटी मुले आणि 57 लाख शिक्षक असतील. या योजनेनुसार पुढील काही वर्षांत या शाळांमध्ये बालवाडी, स्मार्ट वर्ग, प्रशिक्षित शिक्षकांची सोय केली जाईल. याचबरोबर आवश्यक व्यवस्था, व्यावसायिक शिक्षा व रचनात्मक शिक्षण प्रकारांचा विकास केला जाईल. याद्वारे शाळांमध्ये सर्वसमावेशक आणि चांगले वातावरण बनविण्यावर भर दिला जाणार आहे, असे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.
Under National Education Policy and Samagra Shiksha 2.0, formalization of playschools and anganwadi is being done. Govt schools will have playschools as well. Teachers will be trained accordingly: Dharmendra Pradhan, Education Minister pic.twitter.com/aF0vu1pHvh
— ANI (@ANI) August 4, 2021
बालकांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी राज्यांना एक आयोग बनविण्यासाठी निधी दिला जाणार आहे. मुलांना व्यावसायिक शिक्षण दिले जाणार आहे. 6 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांशी ओळख करून दिली जाणार आहे. 9 वी ते 12 वीच्या मुलांसाठी त्यांच्या आवडीनुसार कौशल्यांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे, असे ठाकूर यांनी सांगितले.