‘दहावी-बारावीच्या परीक्षा यंदा उशिरा’; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे सूतोवाच  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 08:06 AM2020-12-01T08:06:13+5:302020-12-01T08:06:32+5:30

राज्यातील काही जिल्ह्य़ातील शाळा मध्ये प्रत्यक्ष अध्ययन- अध्यापन प्रक्रिया सुरू झाली आहे आणि ज्या ठिकाणी शाळा सुरू नाहीत त्या ठिकाणी ऑनलाइन शिक्षण पध्दती सुरळीत चालू आहे.

‘X-XII exams late this year’; Education Minister Varsha Gaikwad's speech | ‘दहावी-बारावीच्या परीक्षा यंदा उशिरा’; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे सूतोवाच  

‘दहावी-बारावीच्या परीक्षा यंदा उशिरा’; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे सूतोवाच  

Next

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्यांना तसेच काही शिक्षकांनाही समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. सद्यस्थितीत तंत्रज्ञान व अध्ययन व अध्यापन प्रक्रिया बदलली असून यासाठी तंत्रज्ञान फोरम तयार करण्यात येणार आहे. शाळेतील शिक्षक, शिक्षण तज्ञ, शिक्षण अधिकारी, एनसीआरटी व बालभारतीच्या संयुक्तपणे शिक्षण क्षैत्रातील बदलांचा व नव्या आव्हानांचा आढावा घेत आहे व भविष्यातील शिक्षक हा अधिक तंत्रस्नेही असेल यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. 

राज्यातील काही जिल्ह्य़ातील शाळा मध्ये प्रत्यक्ष अध्ययन- अध्यापन प्रक्रिया सुरू झाली आहे आणि ज्या ठिकाणी शाळा सुरू नाहीत त्या ठिकाणी ऑनलाइन शिक्षण पध्दती सुरळीत चालू आहे. या कोरोनाच्या काळात शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी दाखवलेला संमय व आत्मविश्वास नक्कीच कौतुकास्पद असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. 

राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे परीक्षा असून,  या परीक्षा पध्दतीमध्ये कोणताही बदल अपेक्षित नाही. परंतु दहावी व बारावीच्या परीक्षा यावर्षी उशिरा होतील असे सूतोवाच शिक्षणमंत्र्यांनी केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा यावर्षी उशिरा म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात व मे महिन्याच्या सुरुवातीला होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. विद्यार्थ्यांचे अवलोकन करून शैक्षणिक परीक्षा होतील, अशी माहिती त्यांनी दिली. 

विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न 
महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर होणार्‍या स्पर्धा परीक्षांसाठी तयार केले जाईल. असे करत असतानाच जिल्हा पातळीवर सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. शालेय शिक्षणाबरोबरच सहशालेय उपक्रम, आधुनिक भौतिक सुविधा, प्रशिक्षण देण्यासाठी सरकारने योजना सुरू केल्या असल्याचेही त्यांनी महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीमध्ये शिक्षण विभागाच्या आढाव्यात म्हटले. 
 

Web Title: ‘X-XII exams late this year’; Education Minister Varsha Gaikwad's speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.