YCMOU MBA प्रवेश २०२२-२३ सुरू, ३१ ऑगस्टपर्यंत करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 12:19 PM2022-08-24T12:19:36+5:302022-08-24T12:37:33+5:30

YCMOU ने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी १६ जुलै पासून प्रथम वर्ष MBA साठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे.

YCMOU MBA Admission 2022-23 Begins Candidates can Apply by August 31 | YCMOU MBA प्रवेश २०२२-२३ सुरू, ३१ ऑगस्टपर्यंत करा अर्ज

YCMOU MBA प्रवेश २०२२-२३ सुरू, ३१ ऑगस्टपर्यंत करा अर्ज

googlenewsNext

YCMOU ने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी १६ जुलै पासून प्रथम वर्ष MBA साठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने १६ जुलैपासून MBA प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा सुरू केली आहे आणि ती २८ ऑगस्ट २०२२ पर्यंत घेतली जाऊ शकते. MBAसाठी YCMOU प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा केवळ ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल आणि ती अनिवार्य आहे.

YCMOU प्रवेश २०२२-२३ MBA साठी महत्वाच्या तारखा

MBA प्रवेशासाठी नोंदणी सुरू झाल्याची तारीख: १६ जुलै २०२२
MBA प्रवेशासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख: ऑगस्ट २८, २०२२
MBA-प्रवेश परीक्षा सुरू झाल्याची तारीख: १६ जुलै २०२२
MBA-प्रवेश परीक्षेची अंतिम तारीख: ऑगस्ट २८, २०२२
प्रथम वर्ष MBA प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी सुरूवातीची तारीख: जुलै १८, २०२२
प्रथम वर्ष MBA प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख: ऑगस्ट ३१, २०२२

YCMOU प्रवेश २०२२-२३ MBA अभ्यासक्रमासाठी अपेक्षित पात्रता

केवळ पात्र उमेदवारांना YCMOU MBA प्रवेशासाठी अर्ज करण्याची परवानगी आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन किंवा असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून  किमान ५० टक्के एकूण गुणांसह (Aggregate) उत्तीर्ण झालेले उमेदवार किंवा त्याचप्रकारे (किमान ४५ टक्के गुणांसह मागास प्रभाग प्रवर्गातील उमेदवार आणि महाराष्ट्र राज्याने आखून दिलेल्या नियमानुसार दिव्यांग प्रवर्गातील व्यक्ती) किंवा तत्सम उमेदवार पात्र असतील.

YCMOU प्रवेश २०२२-२३ MBA प्रवेश परीक्षा

महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने घेतलेल्या प्रवेश परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. चाचणीमध्ये खालील विभागांचा समावेश आहे.

● वाचन आकलन - १२ गुण
● शाब्दिक क्षमता - २० गुण
● संख्यात्मक क्षमता - १६ गुण
● व्यवसाय डेटा इंटरप्रिटेशन - २४ गुण
● व्यवसाय अर्ज - १६ गुण
● व्यवसाय निर्णय - १२ गुण

सर्व प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील आणि चार पर्यायांपैकी एकच पर्याय बरोबर असेल. प्रत्येक प्रश्नाला २ गुण असतील.

YCMOU प्रवेश २०२२-२३ नोंदणी प्रक्रिया

प्रवेश परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना खालील सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे:

१. इच्छुक उमेदवार युनिव्हर्सिटी पोर्टलवर ( ycmou.digitaluniversity.ac ) ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज आणि परीक्षा शुल्क ५०० रूपये इतके आहे.

२. प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार विद्यापीठ पोर्टलच्या होमपेज च्या उजव्या बाजूला दिसतील. तेथील प्रवेश घेण्यासाठी उपलब्ध ऑनलाइन प्रवेश बॉक्सवर (online admission box) क्लिक करा.

३. ऑनलाइन अर्ज भरताना प्रथम अभ्यासक्रम निवडावा, अभ्यास केंद्र आणि विषय निवडून नंतर वार्षिक प्रवेश शुल्क ऑनलाइन भरावे.

४. पहिल्या वर्षाची प्रवेश अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर निवडलेल्या अभ्यास केंद्राशी संपर्क साधून, अभ्यास केंद्र शुल्क (अभ्यास केंद्राची मान्यता) भरून प्रवेश अर्ज स्वीकारला जाईल. त्यानंतरच प्रथम वर्षाचा प्रवेश निश्चित झाल्याचे मानले जाईल.

५. प्रवेश परीक्षेत पात्र न ठरलेले उमेदवार प्रवेश परीक्षेसाठी नव्याने नोंदणी करण्यासाठी पुन्हा पात्र ठरू शकतात.

६. प्रवेश परीक्षेसाठी पात्र ठरणे ही प्रवेश मिळण्यासाठीची पात्रता नाही. MBA अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी, निकष पूर्ण करणारे उमेदवार प्रथम वर्षासाठी पात्र मानले जातील, उमेदवारांना प्रवेश परीक्षा द्यावीच लागेल.

ऑनलाइन परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना:

१. (परीक्षा देण्यासाठी) Android फोन, डेस्कटॉप, लॅपटॉप (Windows/Linux/Mac) चा वापर करावा. त्याचा समोरचा कॅमेरा हा वेब-कॅमचे कार्य करेल.

२. कृपया फक्त Google Chrome किंवा Mozilla Firefox चे अपडेटेड व्हर्जन वापरावा.

३. कृपया विश्वासार्ह इंटरनेट कनेक्शन वापरावे.

४. परीक्षा सुरू करण्याआधी कृपया तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप पूर्ण चार्ज झाला असल्याची खात्री करून घ्या.

५. कृपया आवश्यक स्टेशनरी (पेन्सिल, पेन, रफ शीट इत्यादि) आपल्याजवळ ठेवा.

६. एकदा तुम्ही सर्व प्रश्न पूर्ण केल्यानंतर तुमची टेस्ट सबमिट होईल. परीक्षेचा वेळ संपण्याआधीच तुम्हाला टेस्ट सबमीट करायची असेल तर तुम्ही 'सबमिट टेस्ट' (Submit Test) बटणावर क्लिक करा. जर वेळ संपेपर्यंत तुम्ही परीक्षा देत असेल तर परीक्षेचा ठरवून दिलेला वेळ संपल्यानंतर टेस्ट आपोआप सबमिट होईल.

नोंदणी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर, विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पावती कलेक्ट करावी आणि प्रवेशाच्या दृष्टीने ती अभ्यास केंद्रात जमा करावी.

Web Title: YCMOU MBA Admission 2022-23 Begins Candidates can Apply by August 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.