परदेशात शिक्षण घ्यायचंय? मग, 'या' युनिव्हर्सिटीस् विद्यार्थ्यांना देतायंत अ‍ॅडमिशनची ऑफर! 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 02:39 PM2023-08-16T14:39:55+5:302023-08-16T14:40:07+5:30

Study Abroad:  काही युनिव्हर्सिटीस् अ‍ॅडमिशनची ऑफर देत आहेत.

you want to study abroad foreign universities are giving such offers to indian students | परदेशात शिक्षण घ्यायचंय? मग, 'या' युनिव्हर्सिटीस् विद्यार्थ्यांना देतायंत अ‍ॅडमिशनची ऑफर! 

परदेशात शिक्षण घ्यायचंय? मग, 'या' युनिव्हर्सिटीस् विद्यार्थ्यांना देतायंत अ‍ॅडमिशनची ऑफर! 

googlenewsNext

जर तुम्हाला परदेशात शिक्षण घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी काही युनिव्हर्सिटीस् अ‍ॅडमिशनची ऑफर देत आहेत. अ‍ॅडमिशन स्टाफ विदेशी विद्यार्थ्यांना सांगत आहेत की, त्यांना ब्रिटिश विद्यार्थ्यांवर अ‍ॅडवाँटेज आहे, कारण त्यांना पहिलेच आपले ग्रेड मिळाले आहेत. याचा अर्थ असा की त्यांनी सर्वात लोकप्रिय अभ्यासक्रमांमध्ये (पॉप्युलर कोर्सेस) जागा मिळवण्यासाठी 'शक्य तितक्या लवकर' अर्ज केला पाहिजे, ज्यामध्ये अजूनही सप्टेंबरसाठी जागा उपलब्ध आहेत.

यूकेच्या विद्यार्थ्यांना त्यांचे ए-लेव्हल निकाल प्राप्त केल्यानंतर अ‍ॅडमिशन दिले जाईल. न्यूकॅसल युनिव्हर्सिटीने आपल्या वेबसाइटवर पोस्ट केले आहे की, परदेशी पास विद्यार्थ्यांना ब्रिटिश शाळा सोडणाऱ्यांच्या तुलनेत 'फायदा' आहे आणि त्यांनी 'लवकरात लवकर' कॉल केला पाहिजे. तर ब्राइटन युनिव्हर्सिटी परदेशातील विद्यार्थ्यांना सांगते की, त्यांना 'यूकेमधील विद्यार्थ्यांपेक्षा लवकर' निकाल मिळण्यात 'कदाचित फायदा' होईल.

पोर्ट्समाउथ युनिव्हर्सिटी परदेशी विद्यार्थांना आवाहन करते की, विद्यार्थ्यांनी शक्य तितक्या लवकर अर्ज केला पाहिजे, कारण व्हिसा मिळविण्यासाठी वेळ द्यावा लागेल. दरम्यान, जास्त फी भरणाऱ्या आकर्षक विदेशी विद्यार्थ्यांमुळे देशांतर्गत विद्यार्थ्यांना अ‍ॅडमिशन दिले जात नाही, असा आरोप आधीच ब्रिटनच्या युनिव्हर्सिटीवर करण्यात आला आहे. "सर्वात उंच एक सिद्धांत आहे, ज्याला नेहमी युनिव्हर्सिटीमध्ये अ‍ॅडमिशनला कंट्रोल केले पाहिजे आणि तो म्हणजे निष्पक्षता. जेव्हा लोकांना असे वाटते की नियम चुकीच्या पद्धतीने लागू केले जात आहेत, तेव्हा एक मोठा प्रतिष्ठेचा धोका असू शकतो", असे हायर एज्युकेशन पॉलिसी इन्स्टिट्यूट थिंक-टँकचे निक हिलमन म्हणाले.  

याचबरोबर, "आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आमच्या युनिव्हर्सिटीला आर्थिकदृष्ट्या पुढे नेत आहेत आणि त्यांचे येथे नेहमीच स्वागत आहे, परंतु यूकेच्या विद्यार्थ्यांशी योग्यरित्या वागले पाहिजे", असेही निक हिलमन म्हणाले. न्यूकॅसल युनिव्हर्सिटीने मेलद्वारे विरोध केल्यानंतर उशीरा अर्ज आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी मंजूरी या ब्लॉगवरून 'फायदा' हा शब्द काढून टाकला आहे.

Web Title: you want to study abroad foreign universities are giving such offers to indian students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.