सेक्सच्या विळख्यात कोवळे मन..! खेळण्या-बागडण्याच्या वयात अघटित घडतेय...

By संतोष आंधळे | Published: December 18, 2022 10:24 AM2022-12-18T10:24:54+5:302022-12-18T10:25:40+5:30

13 वर्षांची दोन मुले त्यांच्याच वर्गातील मुलीवर कुणी वर्गात नसल्याचे पाहून लैंगिक अत्याचार करतात, तर दुसऱ्या घटनेत 15 वर्षांचा मुलगा नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची गळा चिरून हत्या करतो. महामुंबईतील या दोन घटनांनी पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे...

Young mind in love with sex..! Unexpected things happen in the play-garden age... need sex Education | सेक्सच्या विळख्यात कोवळे मन..! खेळण्या-बागडण्याच्या वयात अघटित घडतेय...

सेक्सच्या विळख्यात कोवळे मन..! खेळण्या-बागडण्याच्या वयात अघटित घडतेय...

googlenewsNext

संतोष आंधळे, विशेष प्रतिनिधी
खेळण्या-बागडण्याच्या वयात मुलांना ‘सेक्स’चे आकर्षण वाटून अघटित घडल्याच्या घटना नुकत्याच घडल्या. बालवयातच डिजिटल साक्षर असलेल्या या पिढीबद्दल अनेक पालकांना कौतुकमिश्रित आश्चर्य वाटत असते. मात्र, आपल्या टेक्नोसॅव्ही पाल्याची ओढ  त्याला भलतीकडेच आकर्षित तर करत नाही ना, हे तपासून घेण्याची वेळ आली आहे. मुलांवर अविश्वास दाखवू नका, असे सांगितले जात असले, तरी त्यांना अतिस्वातंत्र्यही देऊ नका, हेही सांगणे तितकेच गरजेचे आहे.  १३ वर्षांची दोन मुले त्यांच्याच वर्गातील मुलीवर कुणी वर्गात नसल्याचे पाहून लैंगिक अत्याचार करतात, तर दुसऱ्या घटनेत  १५ वर्षांचा मुलगा नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची गळा चिरून हत्या करतो. महामुंबईतील या दोन घटनांनी पालकवर्गाला बुचकळ्यात टाकले आहे. या घटनेतील बाल गुन्हेगारांची पार्श्वभूमी कुठलीही असो. मात्र, या अशा पद्धतीचे विचार मुलांच्या मनात येऊ शकतात, ते या घटनांनी सिद्ध होते.

लहान वयातच मुलांच्या डोक्यात ‘गुन्हेगारी आणि सेक्स’ हे विषय कोण घुसवत असतील, तर त्याचे सोपे उत्तर म्हणजे मोबाइल. सध्या तर इंटरनेट डेटा चॉकलेटच्या किमतीत सहज उपलब्ध आहे. कुठे, कधी, काय पाहावे, हे मुले स्वत:च ठरवतात, सर्चमधील हिस्ट्री नष्ट करण्याचे ज्ञान ते सहज प्राप्त करतात. विशेष म्हणजे, हे लोण शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही पसरले आहे. मुलांमध्ये पॉर्न व्हिडीओ सर्रासपणे शेअर केले जात असल्याच्या धक्कादायक गोष्टी घडत आहेत. हे इतक्या कल्पकतेने केले जाते की, पालकांना याची भनकही लागत नाही. गुन्हे घडून त्यांना बालसुधारगृहात ठेवावे लागण्याच्या आधीच या गोष्टींना आळा घालण्यासाठी पालक, शिक्षक यांना एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.  

संवाद खुंटलाय 
कोरोनाच्या काळात लहान मुले ५-६ तास स्क्रीनवर बसून होती. याचा भविष्यात त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होईल, याचा विचारच केला गेला नाही. त्याचप्रमाणे महत्त्वाचे म्हणजे, पालकांचा मुलांशी आणि मुलाचा पालकांशी संवाद तुटलाय. त्यासारखीच परिस्थिती म्हणजे,  शिक्षकांचा विद्यार्थ्यांबरोबर संवाद होत नाही. लैंगिक शिक्षण या विषयावर चर्चा घडू शकेल, असे पोषक वातावरण अजूनही तयार झालेले दिसून येत नाही. याकरिता एकमेव सध्या उपाय म्हणजे मोकळा संवाद होणे गरजेचे आहे, तो कुठेतरी खुंटलाय असे वाटते. 
- चिन्मयी सुमित, मराठी शाळा सदिच्छादूत आणि पालक

लैंगिक शिक्षणाची गरज 
सध्या ज्या पद्धतीने लहान मुलांच्या बाबतीत ज्या घटना आमच्याकडे येत आहेत, त्या सगळ्या घटना पाहता, शाळेत लहानपणापासूनच लैंगिक शिक्षणाची अत्यंत गरज असल्याचे दिसून आले आहे. गुड टच आणि बॅड टच पलीकडे जाऊन आता सेफ टच आणि अनसेफ टच अशा पद्धतीने मांडणी करण्याची गरज आहे. ९० टक्के प्रकरणात ओळखीचे लोक अत्याचार करत असल्याचे दिसून येत आहे. आमच्याकडे अशी अनेक मुलांची प्रकरणे आहेत. त्यामध्ये मुलांना पॉर्न साइट बघण्याचे आणि सेक्स चॅट करण्याचे व्यसन जडले आहे. पालकांना जर आपला मुलगा अशा पद्धतीने पॉर्न बघत असल्याचे कळले, तर त्यांना मारणे, ओरडणे यापेक्षा त्याला बसवून त्याचे दुष्परिणाम समजून सांगितले पाहिजे; परंतु खासगी डॉक्टरांच्या साहाय्याने या गोष्टी वेळेतच दाखवून त्यावर योग्य उपचार केले जाऊ शकतात.   
सोनाली पाटणकर, 
संस्थापक, रिस्पॉन्सिबल नेटिझन्स 

Web Title: Young mind in love with sex..! Unexpected things happen in the play-garden age... need sex Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.