जगाचे भविष्य काळे करणारे देश कोणते ?; मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 06:36 AM2023-12-06T06:36:11+5:302023-12-06T06:36:21+5:30
औद्योगिक प्रगतीमुळे चीन आणि भारताचे कार्बन उत्सर्जन भविष्यात आणखी वाढणार आहे.
नवी दिल्ली : जीवाश्म इंधनाच्या अतिवापरामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहेत. जीवाश्म इंधन जाळल्याने कार्बन डायऑक्साइडसारखे मोठ्या प्रमाणात हरितगृह वायू तयार होतात, जे ग्लोबल वार्मिंग आणि हवामान बदलास कारणीभूत ठरतात.
वनस्पती आणि प्राण्यांच्या जीवनावर विपरित परिणाम होत आहेत. चीन, भारत आणि अमेरिका या लोकसंख्येनेही मोठ्या असलेल्या देशांकडून जगातील ५२ टक्के कार्बन डायऑक्साइडची निर्मिती केली जाते. औद्योगिक प्रगतीमुळे चीन आणि भारताचे कार्बन उत्सर्जन भविष्यात आणखी वाढणार आहे.
या देशांतून सर्वाधिक कार्बन उत्सर्जन
चीन ३०.९ %
अमेरिका १३.५ %
भारत ७.३ %
रशिया ४.७ %
जपान २.९ %
इराण २.० %
जर्मनी १.८ %
सौदी अरेबिया १.८ %
इंडोनेशिया १.७ %
दक्षिण कोरिया १.७ %
कॅनडा १.५ %
ब्राझिल १.३ %
तुर्किये १.२ %
दक्षिण आफ्रिका १.२ %
मेस्किको १.१ %
ऑस्ट्रेलिया १.१ %
इंग्लंड ०.९ %
इटली ०.९ %
पोलंड ०.९ %
४२२ अब्ज मेट्रिक टन इतका कार्बन डायऑक्साइड औद्योगिक क्रांतीला सुरूवात झाल्यापासून एकट्या अमेरिकेने वातावरणात सोडलेला आहे. १५.३२ मेट्रिक टन इतके सर्वाधिक दरडोई कार्बन उत्सर्जन अमेरिकेत होते. चीन आणि भारतात हे प्रमाण अनुक्रमे ७.४४ आणि १.८९ इतके आहे. भारताचा वाटा एकूण कार्बन उत्सर्जनात २०३० पर्यंत वाढू शकतो, असा अंदाज द इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने व्यक्त केला आहे.