‘राष्ट्रीय फुलपाखरा’साठी ६० हजार मतदान; अहवाल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 02:18 AM2020-10-11T02:18:34+5:302020-10-11T02:19:09+5:30
राष्ट्रीय वृक्ष, प्राणी, पक्षी आणि राष्ट्रीय फुल देखील आहे. मग फुलपाखरू का नसावे, म्हणून ही निवडणूक घेण्यात आली.
पुणे : राष्ट्रीय फुलपाखराची निवड करण्यासाठीची निवडणूक झाली असून, त्यात सुमारे ६० हजार नागरिकांनी आवडीच्या फुलपाखराला मतदान केले आहे. असा उपक्रम पहिल्यांदाच घेतला आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्याची माहिती निवडणूक समन्वयक दिवाकर ठोंबरे यांनी 'लोकमत'ला दिली.
राष्ट्रीय वृक्ष, प्राणी, पक्षी आणि राष्ट्रीय फुल देखील आहे. मग फुलपाखरू का नसावे, म्हणून ही निवडणूक घेण्यात आली. राष्ट्रीय फुलपाखरासाठी सात फुलपाखरू उमेदवार होते. त्यापैकी एकाची निवड नागरिकांना करायची होती. यासाठीचे आॅनलाईन मतदान ८ आॅक्टोबरला संपले असून, त्याचा अहवाल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय फुलपाखराची घोषणा होईल.
या उपक्रमाचे समन्वयक ठोंबरे म्हणाले, मत दिलेल्यांंपैकी ४० ते ५० टक्के लोकांना फुलपाखरांची संपूर्ण माहिती नव्हती. यामुळे इत्यंभूत माहिती हजारो लोकांपर्यंत गेली. संवर्धनासाठी त्याचा उपयोग होईल.''
कोण बाजी मारणार ?
इंडियन जझेबेल, फाइव्ह बार स्वॉर्डटेल, कृष्णा पिकॉक, यलो जॉरजोन, आॅरेंज ओकलिफ, नॉर्थन जंगलक्वीन आणि इंडियन नवाब असे सात उमेदवार आहेत. कोण बाजी मारेल, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.