यंग क्लायमेट चॅम्पियन्ससोबत हवामान कृतीकडे दृष्टीक्षेप या विषयावरील कार्यशाळेला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 11:54 AM2020-02-01T11:54:11+5:302020-02-01T12:38:17+5:30
युथ की आवाजकडून १ आणि २ फेब्रुवारी २०२० रोजी क्लायमेट अॅक्शन या विषयावर दोन दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन वायएमसीए , मुंबई सेंट्रल येथे केले जात आहे.
मुंबई - युथ की आवाजकडून १ आणि २ फेब्रुवारी २०२० रोजी क्लायमेट अॅक्शन या विषयावर दोन दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन वायएमसीए , मुंबई सेंट्रल येथे केले जात आहे. या वेळी विविध क्षेत्रात भारताने शून्य ऊत्सर्जन साध्य करावे यासाठी निर्णयकर्त्यांकडून मागणी करणाऱ्या डिजिटल मोहिमांच्या निर्मितीत वापरली जाणारी शक्तिशाली सोशल मीडिया कौशल्ये तरूणांना शिकता येतील.
पुढील काही महिन्यांत तयार होणाऱ्या काही सर्वोत्तम मोहिमांना ५०,००० रूपयांची फेलोशिप देण्यात येईल जेणेकरून ते आपल्या मोहिमा दीर्घकाळ चालवू शकतात आणि आपल्या मागणीला पाठिंबा देणारे जास्त लोक जमा करू शकतात. अभिर भल्ला (१८), नवी दिल्ली, पूजा जैन (२६), मुंबई, लिली पॉल (२४), नवी दिल्ली, चैतन्य प्रभू (२१), मुंबई, साहित्य पलंगंदा पूनाचा (२३), बंगळुरू, रिझवान पाशा (२७) चेन्नई असे काही तरूण या कार्यशाळेत सहभागी होणार असून ते अनेक वर्षांपासून वैयक्तिकरित्या हवामान कृती आणि शाश्वतेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.
दोन दिवसांमध्ये या तरूणांना आपले समस्या विधान स्पष्ट करून ऑनलाइन मोहीम कशी तयार करायची, निर्णयकर्त्यांसमोर ठेवण्यासाठी आपली मागणी कशी तयार करायची, आपल्या लक्ष्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी धोरणे, आपला आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा कसा वापर करायचा, आणि ते प्रसारमाध्यमे आणि शासनाच्या विविध पातळ्यांवरील, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींपासून ते शासकीय अधिकारी असलेल्या निर्णयकर्त्यांवर कृतीच्या मागणीसाठी कसा प्रभाव टाकू शकतात याचे प्रशिक्षण दिले जाईल.
युथ की आवाजचे संस्थापक आणि मुख्य संपादक अंशुल तिवारी म्हणाले की, आता आपण हवामानाबाबत कृती करण्यासाठी अधिक गंभीर झाले पाहिजे आणि आपल्या निर्णयकर्त्यांनाही गंभीर राहण्याची मागणी केली पाहिजे. जगभरात तरूण लोक हवामानाबाबत कृतीची चळवळ चालवत आहेत आणि भारतातही आपल्या भविष्याबाबत चिंतित असलेले लाखो विद्यार्थी आहेत. आता सरकारने तरूणांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणे थांबवणे आणि हवामान बदलाविरोधात काम करणे गरजेचे आहे. हा कार्यक्रम आणि आमचा प्रकल्प या दिशेने एक पाऊल उचलण्याचा प्रयत्न करत आहे.
भारत हा चीन आणि अमेरिकेसारख्या विकसित देशांनंतर ग्रीनहाऊस गॅस (सीएचजी) ऊत्सर्जन करणारा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा देश आहे. जीवाश्म इंधनांच्या ज्वलनाचा दर वाढत असल्यामुळे कार्बन डाय ऑक्साइड आणि इतर धोकादायक वायूंसारख्या ग्रीनहाऊस वायूंचे ऊत्सर्जन वाढू लागले आहे. त्यामुळे ओझोन पट्ट्याचे नुकसान झाले असून पृथ्वीचे तापमानही वाढू लागले आहे. याच दृष्टीकोनातून भारतात ऊर्जा, वाहतूक, कृषी आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांमधून कार्बनचे ऊत्सर्जन कमी करण्यासाठी शाश्वत आणि सुस्पष्ट धोरणाची कमतरता जाणवते.
या कार्यशाळेतून भारतात कार्बन डाय ऑक्साइडचे ऊत्सर्जन कमी करण्यासाठी पद्धतशीर बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि या समस्यांवर आपल्या जाहिरात मोहिमेद्वारे काम करणाऱ्या १८-३० वर्षे वयोगटातील तरूण कार्यकर्त्यांना सहभागी करून घेतले जाईल. भारत नोव्हेंबर २०२० पर्यंत हवामान बदलावरील दीर्घकालीन धोरण अंतिम करण्यासाठी सज्ज होत असताना या अॅक्शन नेटवर्क कार्यशाळेतून विविध क्षेत्रांमध्ये कार्बन ऊत्सर्जन कमी करण्यासाठी भर देण्यावर प्रभाव टाकण्याचे ध्येय समोर ठेवण्यात आले आहे. मुंबईतील कार्यशाळेसाठी निवडण्यात आलेले अॅक्शन नेटवर्कचे फेलो देशभरातून आलेले आहेत. त्यांची भारतातील विविध क्षेत्रांमध्ये वाढत्या कार्बन ऊत्सर्जनाकडे लक्ष वेधून घेणाऱ्या मोहिमा तयार करण्यासाठीचे स्वारस्य आणि कल यांच्याद्वारे करण्यात आली आहे.