अमेरिकेचं ‘हे’ शहर पाण्याखाली जातंय; वेळीच रोखलं नाही तर उद्ध्वस्त होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 11:23 PM2021-11-16T23:23:07+5:302021-11-16T23:23:27+5:30

अलीकडेच जलवायू परिवर्तनावरुन सीओपी २६ चं आयोजन करण्यात आले होते.

Chicago Sinking Into The Ground, Scientist Warns All It Takes Is Inches | अमेरिकेचं ‘हे’ शहर पाण्याखाली जातंय; वेळीच रोखलं नाही तर उद्ध्वस्त होईल

अमेरिकेचं ‘हे’ शहर पाण्याखाली जातंय; वेळीच रोखलं नाही तर उद्ध्वस्त होईल

googlenewsNext

वॉश्गिंटन – ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. इतकचं नाही तर जगातील अनेक भाग आहेत जिथं याचा परिणाम पाहायला मिळतोय. त्यामुळे समुद्र किनारी असलेल्या शहरांना पाण्याचा धोका वाढला आहे. जमीन खचण्याचे प्रकार घडत आहेत. या संकटातून जगातील सर्वात ताकदवान देश अमेरिकाही वाचू शकत नाही. अमेरिकेतील प्रमुख शहरात इंच इंच करत पाण्याची पातळी वाढत आहे.

वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे की, जर लवकरच काही केले नाही तर परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता आहे. अलीकडेच जलवायू परिवर्तनावरुन सीओपी २६ चं आयोजन करण्यात आले होते. तरीही पृथ्वीला संकटातून बाहेर काढण्यासाठी अशा बैठकामधून कुठलाही ठोस उपाय काढू शकत नाही असं बहुतांश देशाचं म्हणणं आहे. या बैठकीनंतर करण्यात येणाऱ्या घोषणांवरही अनेक वाद निर्माण होतात.

अमेरिकेचं शिकागो शहर पाण्यात बुडणार

अमेरिकेच्या शिकागो शहराला पाण्याचं संकट आहे. अमेरिकेतील मोठ्या शहरांपैकी एक शिकागो आहे. या शहरात जवळपास २७ लाख लोकं वास्तव्य करतात. न्यूयॉर्क आणि लॉस एंजिल्सनंतर अमेरिकेतील जास्त लोकसंख्या असणारं हे तिसरं शहर आहे. १०० वर्षापूर्वीची तुलना केली तर शिकागो कमीत कमी ४ इंच पाण्याखाली गेले आहे. पुढील काही वर्षांत शिकागो याच वेगाने पाण्याखाली जाणार आहे. २०००० अधिक वर्षापूर्वी पृथ्वीचा बहुतांश भाग हिमनद्यांच्या बर्फाखाली गेला होता. नॅशनल ओशन एंड एटमॉस्फेरिक एडमिनिस्ट्रेशनचे चीफ जियोडेसिस्ट डेनियल रोमनने सांगितले की, एका दशकात हे शहर १ सेंमी पाण्याखाली जात आहे. सामान्य लोकांच्या नजरेत ही खूप धीमी प्रक्रिया आहे. परंतु ही कधी बंद होत नाही.

Web Title: Chicago Sinking Into The Ground, Scientist Warns All It Takes Is Inches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.