World Environment Day: कांदळवनांचा ऱ्हास शहरांच्या विनाशास कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 01:22 AM2020-06-05T01:22:51+5:302020-06-05T01:23:21+5:30

समुद्री परिसंस्था व किनाºयावरील जैवविविधता सध्या अनेक गंभीर धोक्यांचा सामना करीत आहे.

The deforestation caused the destruction of cities | World Environment Day: कांदळवनांचा ऱ्हास शहरांच्या विनाशास कारणीभूत

World Environment Day: कांदळवनांचा ऱ्हास शहरांच्या विनाशास कारणीभूत

Next

कांदळवने ही निसर्गाने पृथ्वीला दिलेली एक महत्त्वपूर्ण देणगी आहे. पृथ्वीवरील सजीवांसाठी प्राणवायू निर्माण करण्यासोबतच ती प्रदूषित पाण्यालाही स्वच्छ करतात. वातावरणातील वाढलेला कार्बन शोषून घेऊन ही कांदळवने मासे, झिंगे, खेकडे यांना खाद्य तसेच सुरक्षाकवच पुरवितात. वादळासारख्या आपत्तींमध्ये तर कांदळवने चक्क ढाल बनून वादळाचा आवेग कमी करण्याचे तसेच त्यांना आत येण्यापासून रोखण्याचे काम करतात. एवढे सर्व करूनही माणूस मात्र ‘विकासाच्या’ नावाखाली या कांदळवनांचा सतत ºहासच करीत राहिला.


आमची समुद्री परिसंस्था व किनाºयावरील जैवविविधता सध्या अनेक गंभीर धोक्यांचा सामना करीत आहे. कांदळवनांसोबतच समुद्री प्रवाळ, किनाºयावरील पाणथळ जागा यांच्यावरही माणसाने आज आक्रमण केले आहे. हवामान बदलामुळे समुद्राच्या पातळीमध्ये वाढ होणे, समुद्राच्या पाण्याच्या आम्लधर्मात बदल होणे व समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढणे, यासारख्या भयावह गोष्टी घडून आल्या आहेत. त्यामुळे आज पृथ्वीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर उपाय म्हणून आता आमच्या परिसंस्थांच्या होणाºया ºहासावर पूर्णत: निर्बंध लादले पाहिजेत.

या परिसंस्थांची बिघडलेली स्थिती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी कठोर पावले उचलावी लागेल. समुद्री किनाºयावर ºहास झालेल्या जागी कांदळवनांची मोठ्या प्रमाणात लागवड करावी लागेल. समुद्री किनाºयावर येऊ घातलेल्या विकास प्रकल्पांवर आता निर्बंध घातले पाहिजेत. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणाºया वाढीकडे पूर्णत: दुर्लक्ष करून प्रस्तावित केलेले नवी मुंबई विमानतळ, मुंबईचा समुद्री किनाºयालगतचा महामार्ग (कोस्टल रोड), भुयारी मेट्रो-३ प्रकल्प या घातक प्रकल्पांवर पुनर्विचार करणे आवश्यक आहे.            
-देबी गोएंका,
कार्यकारी ट्रस्टी,  कॉन्झर्व्हेशन एक्शन ट्रस्ट, मुंबई

Web Title: The deforestation caused the destruction of cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.