'तो' पुन्हा येणार? सुरुवात नदी, तलावांपासून होणार; नव्या रिपोर्टनं सगळेच हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 09:51 AM2022-07-16T09:51:35+5:302022-07-16T09:52:00+5:30

जागतिक तापमान पर्मियन काळाच्या बरोबरीस पोहचले आहे. जगातील अनेक नदी, तलावात घातक जीवाणू आणि विषारी शेवाळं यांचे प्रमाण वाढत आहे

During the world’s worst mass extinction, bacteria and algae devastated rivers and lakes a warning | 'तो' पुन्हा येणार? सुरुवात नदी, तलावांपासून होणार; नव्या रिपोर्टनं सगळेच हादरले

'तो' पुन्हा येणार? सुरुवात नदी, तलावांपासून होणार; नव्या रिपोर्टनं सगळेच हादरले

googlenewsNext

सिडनी - मागील ४०० कोटी वर्षांत पृथ्वीवर अनेकदा प्रलय आलेला आहे. निसर्गाने अनेकदा प्रकोप दाखवत मोठ्या प्रमाणात जीवहानी केली आहे. आता पुढील प्रलयाची सुरूवात झाली आहे. जगातील नदी, तलावांपासून याचा प्रारंभ झाला आहे. कारण ग्लोबल वॉर्मिंग आणि जलवायू परिवर्तनामुळे घातक जीवाणू आणि विषारी शेवाळ(Toxic Algal Bloom) वेगाने वाढत आहे. पृथ्वीवरील प्रलयासाठी हेच मुख्य कारणीभूत ठरणार आहे. ज्यामुळे अनेक जीवांचा नाश होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

सर्वात धोकादायक प्रलय स्थिती पर्मियन काळाच्या(२३ते२० कोटी वर्षापूर्वीचा काळ) अखेरीस आली होती. त्यावेळी नकारात्मक स्थिती तयार झाली होती जे त्याकाळातील जीवांना घातक ठरली. चहुबाजूने जंगलाला आग, दुष्काळ, समुद्रातील पाणी गरम झाले. धोकादायक जीवाणू, विषारी शेवाळ वाढलं होते. नदी, तलाव आणि अन्य पाण्याचे स्त्रोत जीवघेणे ठरले. ऑक्सिजन संपला होता. जीव मृत्यू पडत होते. अत्यंत कमी जीव या काळात वाचले होते. या काळात पृथ्वीवरील ७० टक्के जीव संपुष्टात आले होते. समुद्रातील ८० टक्के प्रजाती नष्ट झाली होती. सध्या माणूस या सर्व घटनांकडे दुर्लक्ष करत आहे. सातत्याने जीवाश्म इंधने काढत आहे. पृथ्वीच्या ज्या थरांमधून जीवाश्म इंधन बाहेर पडतात त्या थरांवर प्रलयाचे पुरावे सापडत आहेत.

अलीकडेच झालेल्या अनेक स्टडी अहवालात याचा खुलासा झाला आहे की, जागतिक तापमानवाढीची पातळी सातत्याने वाढत आहे जुन्या प्रलयावर रिसर्च करणाऱ्या वैज्ञानिकांच्या टीमचे क्रिस्टोफर फील्डिंग म्हणाले की, जागतिक तापमान पर्मियन काळाच्या बरोबरीस पोहचले आहे. जगातील अनेक नदी, तलावात घातक जीवाणू आणि विषारी शेवाळं यांचे प्रमाण वाढत आहे. अशास्थितीत पर्मियन काळासारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. एक प्रजाती संपली तर त्याचा परिणाम दुसऱ्यावर पडणार आहे. त्यामुळे पृथ्वीवरील पर्यावरणीय संतुलन बिघडेल आणि प्रलयाची सुरुवात होईल. 

सध्याची स्थिती काय? जाणून तुम्हीही हैराण व्हाल
ज्यारितीने तापमानात वाढ होत आहे. जंगलात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होतेय. २०१९ आणि २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात लागलेल्या आगीचं सर्वात मोठं उदाहरण आपल्यासमोर आहे. ज्यात कोट्यवधी जीव मृत्युमुखी पडले. कॅलिफोर्नियापासून युरोपपर्यंत, रशियाच्या आर्कटिकपासून भारताच्या उत्तराखंडपर्यंत प्रत्येक ठिकाणी तापमान वाढीमुळे जगंलात आगीच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे जंगलात राहणाऱ्या जीवांसाठी जीवघेणी स्थिती आहे. 

पुढील प्रलय कधी येईल याबाबत वैज्ञानिकांनी सांगितले नाही परंतु महत्त्वाचं म्हणजे, या प्रलयाची सुरुवात झाली आहे. कार्बन डायऑक्साइड वाढल्याने तापमानात वाढ होत आहे. रोग पसरणे, जंगलाला आग लागणे, समुद्रातील पाण्याची पातळी वाढणे या घटना घडत आहेत. परंतु त्याची सुरुवात नदी आणि तलावापासून होत आहे. जेव्हा आपले पाण्याचे स्त्रोत ऑक्सिजन विरहित होतील तेव्हा जीव नष्ट होतील, झाडे मृत होतील. हीच परिस्थिती पृथ्वीवरील सर्व जीवांच्या मृत्यूचं कारण बनेल. 

Web Title: During the world’s worst mass extinction, bacteria and algae devastated rivers and lakes a warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.