पृथ्वीचे होतेय वाळवंट, 77 टक्के जमीन झाली कोरडी; समस्या अतिशय गंभीर, अब्जावधी लाेकांना बसला फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 08:04 IST2024-12-10T08:04:01+5:302024-12-10T08:04:14+5:30
संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण प्रतिबंध संमेलन’ने (यूएनसीसीडी) हा अहवाल जारी केला. हरितगृह वायू उत्सर्जन राेखले नाही तर, येत्या काही वर्षांमध्ये ३% आर्द जमीन कोरडी होईल.

पृथ्वीचे होतेय वाळवंट, 77 टक्के जमीन झाली कोरडी; समस्या अतिशय गंभीर, अब्जावधी लाेकांना बसला फटका
वाॅशिंग्टन : भविष्यातील युद्धे पाण्यासाठी हाेतील, असे अनेकदा बाेलले जाते. याचे कारणही तेवढेच चिंताजनक आहे. गेल्या ३० वर्षांमध्ये पृथ्वीवरील जवळपास ७७ टक्के जमीन काेरडी झाली आहे. या भागात २०२० पर्यंतच्या तीन दशकांमध्ये वातावरण काेरडे झाले असून पाण्याचे प्रमाण अत्यल्प झाले आहे.
‘संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण प्रतिबंध संमेलन’ने (यूएनसीसीडी) हा अहवाल जारी केला. हरितगृह वायू उत्सर्जन राेखले नाही तर, येत्या काही वर्षांमध्ये ३% आर्द जमीन कोरडी होईल. काेरडेपणाच्या धाेक्यावर प्रथमच शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण झाल्याचे यूएनसीसीडीचे कार्यकारी सचिव इब्राहिम थियाव यांनी सांगितले.
५ अब्ज लाेकांना बसणार फटका
काेरड्या जमिनीवर राहणारी लाेकसंख्या गेल्या ३ दशकात वाढून २.३ अब्ज एवढी झाली आहे. असेच चित्र कायम राहिले तर वर्ष २१०० पर्यंत ही लाेकसंख्या ५ अब्जांपर्यंत वाढू शकते.
पृथ्वीवर वाळवंटीकरण वाढेल आणि हवामानातील काेरडेपणामुळे अब्जावधी लाेकांचे आयुष्य आणि उपजीविकेला धाेका निर्माण हाेईल, असा इशारा अहवालातून देण्यात आला आहे.
भारतापेक्षा एक तृतीयांश माेठा भाग ४३ लाख
चाैरस किलाेमीटर एवढ्या प्रदेशापर्यंत काेरड्या जमिनीचा विस्तार आहे.
भारतात माेठ्या प्रदेशात दुष्काळाचा धाेका
अहवालात म्हटले आहे की, भारताचा एक माेठा प्रदेश काेरडा पडणार असून चीनलाही असाच धाेका आहे.
याशिवाय इजिप्त, पाकिस्तान, मध्य पश्चिम अमेरिका, उत्तर-पूर्व ब्राझील, दक्षिण-पूर्व अर्जेंटिना, संपूर्ण भूमध्य सागरीय क्षेत्र, काळा समुद्राची किनारपट्टी, दक्षिण ऑस्ट्रेलिया इत्यादी प्रदेशांना माेठा फटका बसणार आहे.
या भागाला बसू शकताे फटका
nअहवालानुसार, जमीन काेरडी हाेण्याची स्थिती युराेपमधील ९६ टक्के भागासह पश्चिम अमेरिका, ब्राझील, आशिया आणि मध्य आफ्रिकेचा भाग शामील आहे.
nदक्षिण सुदान आणि टांझानियाचा माेठा प्रदेश काेरडा हाेणार आहे.