ग्रीन ऑफिसला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 11:25 PM2020-02-28T23:25:11+5:302020-02-28T23:26:06+5:30

मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू आदी प्रमुख शहरांत जी वाणिज्य संकुले उभारण्यात येत आहेत, त्यात ग्रीन बिल्डिंगला प्राधान्य दिले जात आहे.

Green office is getting preference | ग्रीन ऑफिसला मिळतेय पसंती

ग्रीन ऑफिसला मिळतेय पसंती

googlenewsNext

- पद्मजा जांगडे

ग्रीन होमनंतर आता ग्रीन ऑफिस ही संकल्पना रुजू लागली आहेत. त्यासाठी रिअ‍ॅलिटी क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांनी ग्रीन आयटी पार्क, वाणिज्य संकुले उभारण्यास सुरुवात केली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या, आयटी कंपन्या, फार्मासिटिकल क्षेत्रातील अनेक कंपन्यांकडून मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू आदी प्रमुख शहरांत जी वाणिज्य संकुले उभारण्यात येत आहेत, त्यात ग्रीन बिल्डिंगला प्राधान्य दिले जात आहे. प्रमुख कंपन्या त्यासाठी विशेष प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात मोठे बदल होत आहेत. आरोग्यावरही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे दहा ते बारा तास कार्यालयात जातात, याशिवाय प्रवासासाठी लागणारा वेळ वेगळा. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक, शारीरिक संतुलन महत्त्वाचे आहे. यासाठी अनेक कंपन्यांकडून त्यांच्या ऑफिस ले-आउटमध्ये बदल करण्यात येत आहे.

कार्यालयीन वातावरण प्रसन्न राहवे, यासाठी ग्रीन ऑफिस, ग्रीन बिल्डिंग संकल्पना राबवली जात आहे. याशिवाय कर्मचाºयांच्या मनोरंजनासाठी गेम झोन, वाचनालय, योगवर्ग, सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. त्यामुळे कर्मचारी प्रसन्न, आनंदी राहू शकतील आणि त्याचा सकारात्मक परिणाम कामावर दिसतो. वार्षिक स्नेहसंमेलन, काव्यवाचन, कार्यशाळा, सणउत्सवात पार्ट्यांचे आयोजन करण्यासाठी स्वतंत्र जागाही ग्रीन ऑफिसमध्ये आवर्जून निश्चित केली जाते.

मुंबई, पुणे, नवी मुंबईत रिअ‍ॅलिटी क्षेत्रातील एका नामांकित कंपनीने उभालेल्या ग्रीन बिल्डिंगला अलीकडेच इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल आणि लीडरशीप इन एनर्जी अ‍ॅण्ड इन्वॉयरमेंट डिझाइनने प्रमाणित केले आहे. ग्रील बिल्डिंग बांधणे म्हणजे केवळ आजूबाजूचा परिसर हरित करणे नव्हे, तर वीजबचत, पाणीबचत, सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर यालाही महत्त्व आहे. सूर्यप्रकाश कार्यालयात यावा, यासाठी काचेच्या भिंती-विभाजकांना प्राधान्य दिले जाते. कामाच्या ठिकाणी हरित क्रांती आणण्याचा हा प्रकार देशांतर्गत कंपन्यांपेक्षा परदेशी, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुजत आहे. सूर्यप्रकाश अधिकाधिक कार्यालयात यावा, यासाठी काचेच्या भिंती, विभाजकांना प्राधान्य दिले जाते.

वाणिज्य वापरासाठी प्रमुख शहरांत ग्रीन बिल्डिंग उभ्या राहत असल्या तरी त्या त्या शहरांतील थंड, उष्ण वातावरणाचा अंदाज घेऊनच डिझाइन केले जातात. ग्रीनहाउसच्या तुलनेत ग्रीन ऑफिसची देखभाल दुरुस्ती सहज व सुलभ असते. कारण हक्काचे घर म्हटले की, प्रत्येक जण आवडीनिवडीनुसार ते सजवतो. अशा वेळी ग्रीनहाउसची थीम प्रत्येक वेळी बदलणे शक्य होत नाही. मात्र, ग्रीन ऑफिसची देखभाल दुरुस्तीसाठी ठरावीक कंपनीला ठेका दिला जातो. अथवा ज्या कंपनीकडून ग्रीन बिल्डिंग किंवा ऑफिस तयार केले जाते, त्याच कंपनीकडून त्याची नियमित देखभाल दुरुस्ती सुविधा उपलब्ध केली जाते.

निसर्गाच्या सानिध्यात शांत, प्रसन्न वातावरण कर्मचाºयांची काम करण्याची क्षमता वाढते. परिणामी, कामही अचूक, दर्जेदार होते. सभोवतालच्या हरित वातावरणाचा मानसिक, शारीरिक स्वास्थावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे एका सर्व्हेत उघड झाले आहे.

Web Title: Green office is getting preference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.