आरोग्यास उपयुक्त किचन गार्डन; फुले, झाडे... सगळीकडे हिरवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 11:12 PM2020-01-17T23:12:03+5:302020-01-17T23:12:43+5:30
आपले घर... त्यापुढे छोटसा बगिचा... फुले, झाडे... सगळीकडे हिरवळ... असे वातावरण कोणाला आवडत नाही? सर्वांनाच आपल्या घराभोवती हिरवीगार झाडे, बगिचा असावा, असे वाटते. मात्र, मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये हे शक्य नाही आणि कल्पनेपलीकडले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तरीही आपली आवड, आपले स्वप्न सत्यात उतरू शकते.
अंजली भुजबळ
ज्यांचे रो-हाउस किंवा तळमजल्यावर घर आहे, त्यांच्यासाठी कीचन गार्डन करणे सहज शक्य आहे, तेही आगदी छोट्याशा जागेत. घराभोवती जर मोकळी जागा असेल तर ती रिकामी राहून तेथे कचरा किंवा किडे, कीटक यांचा प्रादुर्भाव होतो, हेही यामधून टाळता येऊ शकते आणि छोटेखानी बगिचा तुम्ही बनवू शकता. तसेच फ्लॅटमध्ये राहत असाल तर घराच्या बाल्कनीत तुम्ही गार्डन तयार करू शकता.अशा प्रकारे झाडे लावण्याचे अनेक कारण आहे. हिरवळ घरात, घराभोवती असेल तर हवा शुद्ध राहण्यास मदत तर होतचे शिवाय मन प्रसन्न राहून घरातही सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते, यामुळे तुमचे दैनंदिन जीवन निश्चितच आनंदी राहण्यास मदत होते.
रसायनमुक्त भाज्या :
तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये कुं डीत भाज्या लावू शकता. यामध्ये वांगे, बटाटे, पालक, मेथी, कोथिंबीर, लाल माठ अशा पालेभाज्याही सहज आणि रसायनमुक्त म्हणजे कोणत्याही खत आणि औषध फवारणीशिवाय सेंद्रिय पद्धतीने पिकवता येऊ शकतात. यामुळे घरातील टाकाऊ कचरा म्हणजे भाज्या निवडल्यानंतर जे देठ, खराब भाज्या, फळ आपण फे कू न देतो, त्याचा खत म्हणून उपयोग के ला जाऊ शकतो. यामुळे वेगळी मेहनत घेण्याची आवश्यकता भासणार नाही. तेव्हा कुं डीत भाजी लावण्याचा प्रयोग करायला काही हरकत नाही. याचा निश्चितच चांगला फायदा तुमच्या आरोग्याला होईल. कारण ताज्या आणि सेंद्रिय भाजीचे काय फायदे आहेत, हे आपण जाणतो.
औषधी वनस्पती :
तुम्ही छोट्याशा कुं डीतही तुळस, कढीपत्ता, पुदिना या सारख्या औषधी वनस्पती लावू शकता आणि जेव्हा गरज भासेल, तेव्हा ताज्या औषधी वनस्पती तुम्हाला घरच्या घरी मिळू शकतात. यात गवती चहा जर लावला तर तो रोज चहात वापरता येऊ शकतो आणि हर्बल टीही बनवता येऊ शकतो. अद्रकही कुं डीत लावता येणे शक्य आहे. अशा औषधी वनस्पती जर घरीच उपलब्ध झाल्या तर तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील.तुळशीचा काढा ताप, सर्दी, खोकल्या सारख्या आजारावर उपयुक्त आहे, तर कढिपत्ता हा अॅन्टीआॅक्सिडेंट आहे. कढिपत्त्याचा नियमित वापर के ला तर आरोग्य चांगले राहते; यामुळे आजारी पडण्याची शक्यता अगदीच कमी होते.
तणावातून मुक्ती :
दैनंदिन कामे आणि आॅफिसमधील ताण-तणावामुळे घरी आल्यावर उत्साह राहत नाही. मात्र, घराच्या बाल्कनीत किंवा शेजारी गार्डन, झाडे किंवा थोडी हिरवळ असेल तर मन प्रसन्न होते. यामुळे तुमचा तणाव काही प्रमाणात नक्कीच कमी होतो. त्यामुळे किचन गार्डन असणे हे सर्व दृष्टीने उपयुक्त आहे. जर येथे विविध रंगी फु ले असतील तर आणखी प्रसन्नवाटते, यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होऊन तणाव कमी होतो.