वेत्ये येथील क्वॉरीतून मोठ्याने सुरूंग स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 18:14 IST2021-03-09T18:12:02+5:302021-03-09T18:14:32+5:30

environment Sindhudurg- वेत्ये येथे सुरू असलेल्या क्वॉरीमधून मोठ्या प्रमाणात सुरूंग लावण्यात येत असून रविवारी दुपारी अशाच प्रकारचा सुरूंग लावण्यात आल्याने त्याचा चार गावांना हादरा बसला. यावर तातडीने कार्यवाही करा अन्यथा आम्हाला न्यायालयात जावे लागेल, असा इशारा इन्सुली पंचायत समितीचे माजी सदस्य बबन राणे यांनी दिला आहे.

Large mine blast from quarry at Vetye | वेत्ये येथील क्वॉरीतून मोठ्याने सुरूंग स्फोट

वेत्ये येथील क्वॉरीतून मोठ्याने सुरूंग स्फोट

ठळक मुद्देवेत्ये येथील क्वॉरीतून मोठ्याने सुरूंग स्फोटक्वॉरिचा त्रास सहन करावा लागतोय

सावंतवाडी : वेत्ये येथे सुरू असलेल्या क्वॉरीमधून मोठ्या प्रमाणात सुरूंग लावण्यात येत असून रविवारी दुपारी अशाच प्रकारचा सुरूंग लावण्यात आल्याने त्याचा चार गावांना हादरा बसला. यावर तातडीने कार्यवाही करा अन्यथा आम्हाला न्यायालयात जावे लागेल, असा इशारा इन्सुली पंचायत समितीचे माजी सदस्य बबन राणे यांनी दिला आहे.

सोमवारी याबाबत त्यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांंची भेट घेऊन रविवारी घडलेला प्रकार सांगितला. तसेच क्वॉरी कायमस्वरूपी बंद करा, अशी मागणी केली.
वेत्ये येथे सुरू असलेल्या क्वॉरीचा त्रास इन्सुली कोठावळे बांध येथील घरांना सहन करावा लागत आहे. आम्ही अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. पण यांची कोणीही दखल घेत नाही. आम्हाला तेथून निर्वासित करा, अशी मागणीही राणे यांनी केली.

रविवारी दुपारी मोठ्या आवाजाचा सुरूंग स्फोट करण्यात आला. यावेळी परिसरातील चार गावांना मोठा त्रास सहन करावा लागला. यावेळी ग्रामस्थ जमा झाले होते. त्यावेळी आम्ही सदर क्वॉरीवर जाऊन माहिती घेतली तसेच प्रांताधिकारी यांच्याकडेही तक्रार केली आहे. आता प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

क्वॉरिचा त्रास सहन करावा लागतोय

वेत्ये येथे सुरू असलेल्या क्वॉरीमुळे आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत असून, एकतर क्वॉरी बंद करा अन्यथा तुम्ही काहीतरी निर्णय घ्या, अशी मागणी राणे यांनी केली आहे. तसेच याबाबत लवकर निर्णय झाला नाही तर आम्हाला न्यायालयात जावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. सतत क्वॉरीचा त्रास सहन करावा लागत असल्याचेही राणे यांंनी सांगितले.

Web Title: Large mine blast from quarry at Vetye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.