रोपवाटिकेसाठी औषधी वनस्पतींच्या बिया करणार जमा, निसर्गमित्रचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 01:44 PM2021-05-06T13:44:21+5:302021-05-06T13:47:30+5:30

environment Tree Nursury Kolhapur : सद्य:स्थितीत एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करणे योग्य नसल्यामुळे, वैयक्तिक पातळीवर निसर्ग संवर्धनासाठी विविध वृक्ष, औषधी वनस्पती, फळझाडे यांच्या बिया जमा करून त्या शास्त्रशुद्ध पद्धतीने रुजवून त्यापासून रोपे तयार करणे सहज शक्य आहे. त्यामुळे निसर्गमित्र परिवार या संंस्थेने औषधी वनस्पतींच्या बिया जमा करून रोपवाटिका तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

The seeds of medicinal plants for the nursery will be collected, a nature-friendly activity | रोपवाटिकेसाठी औषधी वनस्पतींच्या बिया करणार जमा, निसर्गमित्रचा उपक्रम

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या आयुर्वेद उपचारात वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या, दुर्मीळ वनौषधी जतन करण्यासाठी निसर्गमित्र संस्थेने आवाहन केले आहे.

Next
ठळक मुद्देरोपवाटिकेसाठी औषधी वनस्पतींच्या बिया करणार जमा, निसर्गमित्रचा उपक्रम कोल्हापूर परिसरात हजारो वनौषधींचा खजिना, जतन करण्यासाठी चळवळ उभी करण्याची गरज

संदीप आडनाईक

कोल्हापूर : सद्य:स्थितीत एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करणे योग्य नसल्यामुळे, वैयक्तिक पातळीवर निसर्ग संवर्धनासाठी विविध वृक्ष, औषधी वनस्पती, फळझाडे यांच्या बिया जमा करून त्या शास्त्रशुद्ध पद्धतीने रुजवून त्यापासून रोपे तयार करणे सहज शक्य आहे. त्यामुळे निसर्गमित्र परिवार या संंस्थेने औषधी वनस्पतींच्या बिया जमा करून रोपवाटिका तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

कोल्हापूरवर निसर्गसंपदेचा वरदहस्त आहे आणि जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात आयुर्वेद उपचारात वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या, दुर्मीळ वनौषधीदेखील जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत. या वनौषधी भविष्यकाळासाठी सांभाळून ठेवणे गरजेचे असल्याने या वनस्पतींच्या बियांचे संकलन आणि रोपनिर्मिती करून त्यांच्या प्रचार- प्रसार करणे यासाठी चळवळ उभी करण्याची गरज आहे.

हे ओळखून निसर्गमित्र संस्था गेली अनेक वर्षे सातत्याने बिया संकलनाचा उपक्रम राबवत आहे. अनेक निसर्गप्रेमी नागरिकांनी, असंख्य दुर्मीळ वनस्पतींच्या बियांचे संकलन करून संस्थेकडे सुपुर्द केले असून, संस्थेने त्या बियांपासून रोपवाटिकेची निर्मितीदेखील केली आहे. यंदा हे वर्ष फळे व पालेभाज्या संवर्धन वर्ष असून, हे वर्ष सर्वांनी स्वतःची काळजी घेऊन घरच्या घरी साजरे करावे, असे आवाहन निसर्ग मित्र संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

आपल्या परिसरात आढळतात या वनौषधी

गुळवेल, गोकर्ण, गुंज, करांदा, मायाळू, घोसाळे, बाजीराव घेवडा, तोरण, रताळे, रान घेवडा, रान मिरवेल, कोहळा, काळीमिरी, फॅशन फ्रुट, वाघाटी, तोंदली, गवती चहा, अडुळसा, हादगा, म्हाळुंग, अश्वगंधा, ओवा, राजिगरा, बंपर (पपनस), सुरण, लिंबू, कढीपत्ता, शेंद्री, निर्गुडी, मेंदी, बंदुकीचा पाला, गोंदणी, अशा अनेक वनौषधी आपल्या परिसरात उपलब्ध आहेत.


आपल्या परिसरात, अवतीभोवती सहजपणे मिळणाऱ्या अनेक फळे, फुले, कंदमुळे, झुडपे, वृक्ष-वेली, अशा विविध वनस्पती व वनौषधींच्या बिया गोळा करून त्यांची रोपवाटिका तयार करण्याचे काम प्रत्येकाने यथाशक्ती करावे, असे आवाहन निसर्गमित्र अनिल चौगुले यांनी केले आहे. बियांचे संकलन करून निसर्गप्रेमी नागरिकांनी घरच्या घरी आपल्या बागेत, परिसरामध्ये वनौषधींची लागवड करावी आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने रुजवून त्यापासून रोपनिर्मिती करावी; अथवा या वनौषधींच्या बियांचे संकलन करून निसगप्रेमी संस्थेकडे देण्याचाही पर्याय आहे.
-अनिल चौगुले,
कार्यवाह, निसर्गमित्र संस्था, कोल्हापूर

 

 

Web Title: The seeds of medicinal plants for the nursery will be collected, a nature-friendly activity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.