कोळी सप्ताह! पाच दिवसांत २० स्पायडरची नोंद, उड्या मारणाऱ्या प्रजातींचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 10:34 AM2021-08-30T10:34:22+5:302021-08-30T10:42:09+5:30

Spider News : कोळ्यांचे विविध प्रकार असून, वर्गवारी त्यांच्या जाळे विणण्याच्या पद्धतीवरून केली जाते.

Spider Week at Fergusson College pune and Record 20 spiders in 5 days including jumping species | कोळी सप्ताह! पाच दिवसांत २० स्पायडरची नोंद, उड्या मारणाऱ्या प्रजातींचाही समावेश

कोळी सप्ताह! पाच दिवसांत २० स्पायडरची नोंद, उड्या मारणाऱ्या प्रजातींचाही समावेश

Next

श्रीकिशन काळे

 पुणे - फग्युर्सन महविद्यालयातील आवारात स्पायडरच्या किती प्रजाती आहेत, त्याचे सर्वेक्षण नुकतेच केले. पाच दिवसांत सुमारे २० प्रकारचे कोळी दिसले. त्याच्या नोंदी आणि फोटो काढले. कोळी दुर्लक्षित असला तरी निसर्गासाठी आवश्यक आहे. त्यांचेही संवर्धन व्हावे, यासाठी हा सप्ताह साजरा होतो. फर्ग्युसन महाविद्यालयातील उपक्रमात अनेक प्रजाती दिसल्या, त्यात जंपिंग स्पायडर जो आफ्रिका आणि मादागास्करमध्ये दिसतो. तो आपल्या भक्ष्यावर हल्ला करून ॲसिड सोडून मारून टाकतो. इतरही अनेक स्पायडर दिसले.

‘आय नेचरॅलिस्ट’ या संस्थेकडून हा उपक्रम झाला. त्यात फग्युर्सनच्या पर्यावरण विषयाचा विद्यार्थी रजत जोशी याने सहकाऱ्यासोबत आवारात पाच दिवस पाहणी केली. यापुर्वी महाविद्यालयात प्राणीशास्त्र अर्थात झूलॉजी विभागातील विद्यार्थी अश्विन वरूडकर या विद्यार्थ्याने २०१४ मध्ये सर्वेक्षण केले. तेव्हा आवारात ६० विविध कोळ्यांच्या प्रजाती सापडल्या होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी यांनी यासाठी प्रोत्साहन दिले, तर पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख डाॅ. रूपाली गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

मी माझ्या सहकाऱ्यांसह सर्वेक्षणात भाग घेतला. आम्ही कोळ्यांच्या प्रजातींचे छायाचित्रण केले. महाविद्यालयाच्या परिसरामध्ये २० विविध कोळ्यांच्या प्रजात्या सापडल्या. प्रामुख्याने orb weavers, signature spiders ani काही सुंदर अशा jumping spiders चा समावेश होता. ही मिळालेली छायाचित्रे आम्ही Inaturalist ह्या संकेतस्थळावर टाकून त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली.

- रजत जोशी, कोळी अभ्यासक विद्यार्थी

कोळ्यांचे विविध प्रकार असून, वर्गवारी त्यांच्या जाळे विणण्याच्या पद्धतीवरून केली जाते. तंबूसारखे जाळे विणणारा कोळी (Tent Spider), नरसाळ्यासारखे जाळे विणणारा कोळी (Funnel Web spiden), जंगलातील झाडांच्या खोडातील पोकळीमध्ये जाळे विणणारा कोळी (Giant Wood Spider), आपल्या जाळ्यावर स्वाक्षरी करणारा कोळी (Signature Spider) असे विविध प्रकारचे कोळी आढळतात.

सर्वच कोळी जाळे विणत नाहीत

काही कोळी न चालता उड्या मारतात म्हणून त्यांना उड्या मारणारे कोळी (Jumper) म्हणतात. तसेच जाळे न विणणारे काही कोळी शिकारी असल्याने त्यांना लांडगा कोळी (Wolf spider) म्हटले जाते. जाळे नसल्याने शिकारी कोळ्याची मादी आपली अंडी आपल्याच पाठीवर वाहत असते.

कोळी बरेच दिवस अन्न-पाण्याव्यतिरिक्त राहू शकतात. अन्न पचवण्याची त्यांची वेगळी पद्धत आहे, ज्यात कोळी आपले पाचक रस आपल्या भक्ष्यात सोडतात आणि मग विघटित झालेले द्रव रूपातील अन्न शोषून घेतात.

 

Web Title: Spider Week at Fergusson College pune and Record 20 spiders in 5 days including jumping species

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.