खाद्य न मिळाल्याने शेकरु मानवी वस्तीकडे, भादवणमध्ये आढळला राज्यपक्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 06:31 PM2021-04-20T18:31:14+5:302021-04-20T18:40:16+5:30

भादवण ( ता. आजरा ) येथे दुर्मिळ असणारा व महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी असलेला (उडती खार) शेकरू आढळून आला आहे. दिवसभर खाद्य न मिळाल्याने तो अशक्त झाला होता. सायंकाळी पुन्हा मराठी शाळेजवळील नारळाच्या झाडाच्या टोकावर बसलेला नागरिकांनी त्याला पाहिले.

State bird Shekru found in Bhadvan | खाद्य न मिळाल्याने शेकरु मानवी वस्तीकडे, भादवणमध्ये आढळला राज्यपक्षी

आंबोलीपासून जवळच असलेल्या भादवण ( ता. आजरा ) येथे आढळलेला शेकरु.

Next
ठळक मुद्देखाद्य न मिळाल्याने शेकरु मानवी वस्तीकडेभादवणमध्ये आढळला राज्यपक्षी

सदाशिव मोरे

आजरा  :  भादवण ( ता. आजरा ) येथे दुर्मिळ असणारा व महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी असलेला (उडती खार) शेकरू आढळून आला आहे. दिवसभर खाद्य न मिळाल्याने तो अशक्त झाला होता. सायंकाळी पुन्हा मराठी शाळेजवळील नारळाच्या झाडाच्या टोकावर बसलेला नागरिकांनी त्याला पाहिले.

 शैलेश मुळीक यांच्या घराच्या पाठीमागील जागेत शेकरू उड्या मारत असल्याचे आढळून आले. कुतूहलाने मुळीक यांनी त्याचे फोटोही घेतले. थोड्यावेळाने तो झाडावर सहज उडी मारून गेला. त्यानंतर दिवसभर तो बांबूच्या बेटात व नारळाच्या झाडावर उड्या मारत होता. दुपारच्या तीव्र उन्हात कावळ्यांनी शेकरूला चोच मारून त्रास देण्याचाही प्रयत्न केला. सुभाष सुतार, शैलेश मुळीक या प्राणी मित्रांनी कावळ्याच्या त्रासातून शेकरूची सुटका केली. कावळ्यांचा त्रास व दिवसभर खाद्य न मिळाल्याने तो अशक्त झाल्याचा दिसत होता.

शेकरू दिसायला गोंडस व आकर्षक असून तांबूस रंगाची झुपकेदार शेपूट आहे. शेकरू दिवसभर एका झाडावरून दुसऱ्या झाडावर सहज १५ ते २० फुटांची लांब झेप घेत होता. लालभडक डोळे, मिशा, अंगभर तपकिरी आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा असणारा शेकरू भादवणमध्ये आढळून आला आहे. दुपारी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी शेकरूला पकडण्यासाठी आले. मात्र त्यावेळी शेकरु बांबूच्या बेटात आत लपून बसला होता.तो बराच वेळ बाहेर आलाच नाही.मात्र सायंकाळी तो पुन्हा नारळाच्या झाडावर उंच टोकावर आढळून आला.

शेकरूचा अधिवास आंबोलीच्या जंगलात....

शेकरू हा दाट जंगलात व नारळ, माड, उंबर या झाडांवर हमखास आढळतो. त्याचा नैसर्गिक अधिवास आजऱ्यापासून जवळच असलेल्या आंबोलीच्या जंगलात आहे. मात्र अचानक तो भादवण गावात दिसल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्यावर्षी तो आर्दाळ गावात आढळून आला होता.



शेकरूचा नैसर्गिक आधिवास जंगल तोडीमुळे संपुष्टात आला आहे.  दाट जंगलातील त्याचे खाद्य कमी झाल्यामुळे तो मानवी वस्तीकडे येत आहे. तो थोडासा लाजरा व उंच झाडावर वास्तव्य करुन राहत असल्याने त्याचा कोणालाही त्रास होत नाही.

- प्रा. डॉ. विनायक आजगेकर,
प्राणीशास्त्र विभाग, आजरा महाविद्यालय.

फोटोकॅप्शन - भादवण ( ता. आजरा ) येथे आढळलेला शेकरु.

Web Title: State bird Shekru found in Bhadvan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.