यवतमाळची प्रणाली साडेआठ हजार किलोमीटरचा प्रवास करून दापोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 05:48 PM2021-05-10T17:48:33+5:302021-05-10T17:50:56+5:30

bycycle rally Ratnagiri : यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुनवट या छोट्याशा गावातून प्रणाली विठ्ठल चिकटे ही साहसी व ध्येयवेडी तरूणी महाराष्ट्र भ्रमणासाठी निघाली आहे. महिला सशक्तीकरण व पर्यावरण संवर्धन जनजागृती, सायकलिंगचा प्रचार, स्थानिक परिस्थिती व मानसिकतेचा अभ्यास हे ध्येय उराशी बाळगून प्रणालीचा प्रवास सुरू आहे़ सुमारे ८,५०० किलोमीटरचा सायकल प्रवास करून ती दापोलीत दाखल झाली होती.

The system of Yavatmal travels eight and a half thousand kilometers to Dapoli | यवतमाळची प्रणाली साडेआठ हजार किलोमीटरचा प्रवास करून दापोलीत

यवतमाळची प्रणाली साडेआठ हजार किलोमीटरचा प्रवास करून दापोलीत

Next
ठळक मुद्देयवतमाळची प्रणाली साडेआठ हजार किलोमीटरचा प्रवास करून दापोलीतप्रदूषण कमी करण्यासाठी सायकल चालवण्याचा संदेश

दापोली : यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुनवट या छोट्याशा गावातून प्रणाली विठ्ठल चिकटे ही साहसी व ध्येयवेडी तरूणी महाराष्ट्र भ्रमणासाठी निघाली आहे. महिला सशक्तीकरण व पर्यावरण संवर्धन जनजागृती, सायकलिंगचा प्रचार, स्थानिक परिस्थिती व मानसिकतेचा अभ्यास हे ध्येय उराशी बाळगून प्रणालीचा प्रवास सुरू आहे़ सुमारे ८,५०० किलोमीटरचा सायकल प्रवास करून ती दापोलीत दाखल झाली होती.


प्रणालीने अवघ्या २१ वर्षात समाजकार्यातील पदवी मिळवली आहे. तिच्या घरची परिस्थिती बेताची आहे. आई व वडील शेती करतात. तिला दोन बहिणीही आहेत. प्रणालीने दापोलीमधील कुडावळे येथे दिलीप कुलकर्णी आणि डॉ. पौर्णिमा कुलकर्णी यांच्याकडे काही दिवस वास्तव्य करून निसर्गस्नेही जीवनशैलीबद्दल जाणून घेतले. पर्यावरणीय सजगता बाळगून दैनंदिन जीवनात खूप मोठी तडजोड न करता कसं छान जगता येतं, हे प्रणाली येथे शिकली. भोगवादी जीवनशैलीचा त्याग करून, संयमित, निरामय, पर्यावरणपूरक अशी जीवनशैली जगणारे कुटुंब विक्रांत आणि मोहिनी पाटील यांनीही तिचा पाहुणचार केला.

प्रणाली काही दिवस चिखलगाव येथील दांडेकर परिवाराकडे पाहुणचार घेत लोकसाधना प्रकल्पाचा अभ्यास करणार आहे. शिक्षण, आरोग्य, शेती, महिला सबलीकरण आणि सर्वांगिण ग्रामविकास या पाच क्षेत्रात लोकसाधना आज काम करत आहे. त्यामुळे येथे खूप काही नवीन शिकायला मिळेल असा विश्वास प्रणालीने बोलून दाखविला.


सायकलने प्रवास करीत प्रणाली नागरीकांशी संवाद साधते. स्थानिक संस्था, शाळा, सरकारी यंत्रणांना भेटी देऊन जनजागृती करते व माहिती पोचवते. त्या-त्या भागातील माहिती घेते, चर्चा करते. आरोग्य जनजागृती आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल चालवा हा संदेश देते.

स्वजबाबदारीवर प्रवास

प्रणालीचा सायकल प्रवास हा व्यक्तिगत स्वजबाबदारीचा आहे. ती सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे पैसे घेऊन निघाली नाही. स्वतः कमीत कमी गरजांमध्ये जगण्याचा प्रयत्न करत आहे. सोबत आर्थिक व वस्तूरूपातील मदतसुध्दा लोकच करतात. या सात महिन्यांत अनेक सुखद अनुभव आले आहेत, असे प्रणालीने सांगितले.
 

Web Title: The system of Yavatmal travels eight and a half thousand kilometers to Dapoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.