World Environment Day : जंगलाचे प्रमाण कमी असल्याने पर्यावरणाचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 10:00 AM2020-06-05T10:00:23+5:302020-06-05T10:48:04+5:30

पर्यावरणातील विविध घटकांचा दिवसेंदिवस ºहास होत असल्याने त्याचा परिणाम निसर्गचक्रातील विविध घटकांवर होत आहे.

World Environment Day: Environmental loss due to low forest cover | World Environment Day : जंगलाचे प्रमाण कमी असल्याने पर्यावरणाचा घात

World Environment Day : जंगलाचे प्रमाण कमी असल्याने पर्यावरणाचा घात

Next

- सदानंद सिरसाट  
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: पर्यावरणातील विविध घटकांचा दिवसेंदिवस ºहास होत असल्याने त्याचा परिणाम निसर्गचक्रातील विविध घटकांवर होत आहे. सतत वाढणारे तापमान, पावसाच्या प्रमाणात होणारी घट, सातत्याने येणारी नैसर्गिक आपत्ती हा त्याचाच परिणाम असल्याने किमान आता तरी पर्यावरणातील घटकांचे जतन करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी जंगल, जीवभूरसायन चक्राचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची जाणीव जागृती निर्माण करणे, त्यासाठीचा प्रयत्न जागतिक पर्यावरण दिनापासून सुरू व्हायला हवा.
नागरिकांनी असेच सुस्त राहून पर्यावरणाच्या होणाऱ्या ºहासाकडे दुर्लक्ष केल्यास सजीवसृष्टीसह मानवी अस्तित्व धोक्यात यायला वेळ लागणार नाही. त्याचे काही पडसाद आताच उमटत आहेत. गत दहा वर्षांत जिल्ह्याच्या तापमान, पाऊसमानात झालेला बदल पाहता पर्यावरणात झपाट्याने झालेले बदल दिसून येतात.
जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण पाहता ते नगण्य आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र पाहता ५६७३ चौ. किमी आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक जिल्हा, राज्य, देशात किमान ३३ टक्के जंगल असणे अनिवार्य आहे. अकोला जिल्ह्यात केवळ ३४०.३७ चौ. किमी क्षेत्रावर जंगल आहे. त्याची टक्केवारी केवळ ६ आहे. त्यातही घनदाट जंगल केवळ ११ चौ. किमी क्षेत्रातच आहे. मध्यम स्वरूपाचे १०८, खुले जंगल २२० चौ. किमी क्षेत्रात आहे. वाढती लोकसंख्या, हवा, पाणी, ध्वनीचे वाढलेले प्रदूषण पाहता हे प्रमाण किती व्यस्त आहे, याचा विचारही शासन, प्रशासन, सामान्य नागरिकांनी अद्यापही न केल्याने पर्यावरणाचा होत असलेल्या घात नजीकच्या काळात विध्वंसक ठरणारा आहे.


शहरात हरितपट्ट्यांची निर्मिती
अकोला शहरातील प्रदूषण पाहता मोठ्या प्रमाणात वृक्षांची गरज आहे. हवेतील कार्बन, सल्फर डायआॅक्साइडचे वाढते प्रमाण त्या तुलनेत आॅक्सिजनचे कमी होत जाणारे प्रमाण चिंताजनक ठरणार आहे. त्यासाठी शहरात हरितपट्ट्यांची निर्मिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. असाच एक प्रयत्न जुने शहरातील हरिहरपेठ परिसरात झाला आहे. चार एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षांचे संवर्धन झाले आहे. त्यातून नागरिकांसाठी प्राणवायूची निर्मिती होत आहे.

वने, वन्यजीवांचे संवर्धनही आवश्यक
पर्यावरणाची साखळी टिकवून ठेवण्यासाठी वने आणि वन्यजीवांचे संवर्धन करणेही तेवढेच आवश्यक आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्यात वन्य जीवांची काळजी घेण्यासाठी पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली. तसेच अवैध चराई, जंगलातील घुसखोरी, लगतच्या बाजूंनी होणारे अतिक्रमण थांबवण्यात आले आहे. परिणामी, या अभयारण्यात प्राणी, वनस्पती, कुरणाचे प्रमाण बºयापैकी वाढले आहे.

पर्यावरणातील अन्नसाखळी व इतरही घटकांचे संवर्धन न झाल्यास नैसर्गिक आपत्तीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ते धोके टाळण्यासाठी मानवाने पर्यावरण अर्थात निसर्गातील घटकांचे संवर्धन करण्याला युद्धपातळीवर प्रयत्न करणे, ही काळाची गरज आहे.
- मनोजकुमार खैरनार, विभागीय वनाधिकारी, वन्यजीव, अकोला.

 

 

Web Title: World Environment Day: Environmental loss due to low forest cover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.