शून्य कार्बन उत्सर्जन हेच ‘पुणे पॅटर्न’चे ध्येय; पर्यावरणमंत्री पॅटर्न राज्यभर राबविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 05:26 PM2020-02-03T17:26:07+5:302020-02-03T17:26:19+5:30

शहरात वाहनांची संख्या, बदलती जीवनशैली आदी कारणांमुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

Zero carbon emissions of 'Pune Pattern'; Environment Minister will implement the pattern the state | शून्य कार्बन उत्सर्जन हेच ‘पुणे पॅटर्न’चे ध्येय; पर्यावरणमंत्री पॅटर्न राज्यभर राबविणार

शून्य कार्बन उत्सर्जन हेच ‘पुणे पॅटर्न’चे ध्येय; पर्यावरणमंत्री पॅटर्न राज्यभर राबविणार

Next

- श्रीकिशन काळे 
पुणे : शहरात वाहनांची संख्या, बदलती जीवनशैली आदी कारणांमुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याचा परिणाम हवामानावर होत आहे. येत्या काळात कर्ब उत्सर्जन कमी केले नाही, तर त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील. म्हणून पुण्यातील पुणे इंटरनॅशनल सेंटरने इतर संस्थांसोबत ‘पुणे टू कार्बन न्यूट्रल बाय २०३०’(शून्य कर्बभार पुणे २०३०)  हा अहवाल तयार केला असून, तो पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना दिला. तेव्हा पर्यावरणमंत्र्यांनी राज्यभर पुण्याचा हा शून्य कर्बभार पॅटर्न राबवू असे म्हटले आहे.

पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) आणि सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन (सीईई) यांच्या पुढाकाराने क्लायमेट कलेक्टिव्ह पुणे (सीसीपी) स्थापन करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये हवामान बदल साक्षरता वाढवण्याभर भर देण्यात येत असून, कर्ब उत्सर्जन कमी करण्यासाठी विशेष आराखडा तयार करून तो नुकताच पर्यावरणमंत्री ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. ‘पाथवे टू टेकिंग पुणे टू कार्बन न्यूट्रल बाय २०३०’ या नावाने अहवाल तयार केला आहे. त्यात येत्या २०३० पर्यंत कसे शहरावरील कर्बभार कमी करता येईल, यावर भर दिला आहे. आतापासून त्यासाठी प्रयत्न केले तर कुठे २०३० पर्यंत कर्ब उत्सर्जन कमी करण्यात यश मिळणार आहे. कारण संपूर्ण कर्ब शून्य करणे तर आता शक्य नाही. परंतु, काही प्रमाणात नागरिकांनी जीवनशैली बदलली, तर नक्कीच भविष्यात वाढणारे कर्ब उत्सर्जन कमी करता येईल, असे अहवालात नमूद आहे.

पुणे हे भारतातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. जर विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षकांमध्ये शून्य कर्बभार आवार ही संकल्पना रूजवली, तर पुण्यातील शिक्षणक्षेत्र संपूर्ण शहराला शून्य कर्बभाराच्या ध्येयाकडे घेऊन जाऊ शकते. त्यामुळे सध्या समुचित-लया समूहातर्फेही कुकिंग फॉर क्लायमेट हा उपक्रम राबविला जात आहे. त्यातून कमीत कमी कर्ब उत्सर्जन करून स्वयंपाक कसा करता येईल, यावर भर आहे, अशी माहिती या समूहाच्या समन्वयक पुर्णिमा आगरकर यांनी दिली. 

पुण्यातूनच सुरुवात का ? 
पुणे मेट्रोपॉलिटनकडे वळत आहे. त्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, तीन कॅँटोन्मेंट बोर्ड आणि हजारो गावे आहेत. हा संपूर्ण ७ हजार २५६ क्वेअर किलोमीटरचा परिसर असून, येत्या २०३० पर्यंत सुमारे १ कोटी ४० लाख लोकसंख्या होण्याची शक्यता आहे. इथे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे हे ठिकाणी हा शून्य कर्बभार करण्यासाठी योग्य आहे. 

कार्बन न्यूट्रॅलिटी म्हणजे काय ? 
वातावरणातील कार्बन अधिकाधिक शोषून घेणे आणि त्याच वेळी त्याचे उत्सर्जन होऊ न देणे म्हणजे कार्बन न्यूट्रॅलिटी होय. तसेच कमी कर्ब उत्सर्जनात जीवन जगता आले पाहिजे. त्यासाठी योग्य नियोजन करून नागरिकांनी स्वत: त्यावर भर देणे आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञान येत असेल, तर त्यातून कमीत कमी कर्ब उत्सर्जन वातावरणात सोडायला हवे. नागरिकांनी इंधन जाळणा-या वाहनांचा वापर कमी करून ई-वाहनांना अधिक प्राधान्य द्यायला हवे. सार्वजनिक वाहतूकीचा वापर वाढविणे आवश्यक आहे. वाहतूकीसाठी शक्य तिथे सायकल वापरली पाहिजे. 

आताच अ‍ॅक्शन घेण्याची गरज का ? 
वातावरणात कार्बन डॉयऑक्साइडचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. पृथ्वीच्या वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण ३५० पीपीएम इतके आवश्यक आहे. परंतु सद्य:स्थितीला ते ४१० आहे. येत्या २०३० पर्यंत तर हे प्रमाण खूप होईल. त्यावर रोख घालणे आवश्यक आहे. जागतिक तापमानात ३ अंशाने वाढ होणार आहे. त्यात लोकसंख्या वाढत असल्याने भविष्यातील हवामान बदल भयंकर होतील. म्हणून आताच त्यावर उपाय करायला हवेत. कार्बन डायऑक्साइड वायू शोषून तो परत जीवाश्म स्वरूपात साठवून ठेवण्याची क्षमता झाडांमध्ये आहे. म्हणून झाडं जगविणे आवश्यक आहे.

Web Title: Zero carbon emissions of 'Pune Pattern'; Environment Minister will implement the pattern the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.