बाबो! 89व्या वर्षी 'बाप' झाला माजी खेळाडू अन् म्हणाला, 'पुढील वर्षीही पाळणा हलवणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 12:33 PM2020-07-06T12:33:05+5:302020-07-06T12:34:08+5:30

बर्नी एस्लेस्टन यांच्या बाळाचे फोटो व्हायरल

I want to be a dad again at 90… and I don’t need Viagra, ex-F1 boss Bernie Ecclestone says | बाबो! 89व्या वर्षी 'बाप' झाला माजी खेळाडू अन् म्हणाला, 'पुढील वर्षीही पाळणा हलवणार'

बाबो! 89व्या वर्षी 'बाप' झाला माजी खेळाडू अन् म्हणाला, 'पुढील वर्षीही पाळणा हलवणार'

googlenewsNext
ठळक मुद्देनव्या बाळाची मोठी बहीण 65 वर्षांची आहेएस्लेस्टन यांनी मार्केटिंग डायरेक्टर फॅबिआना हिच्याशी विवाह केला.

जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं असताना सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. पण, फॉर्म्युला वन शर्यतीचे माजी प्रमुख बर्नी एस्लेस्टन यांच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. एस्लेस्टन हे वयाच्या 89व्या वर्षी बाप झाले आहेत. त्यांची पत्नी फॅबिआना फ्लोसी हिचं वय हे बर्नींपेक्षा निम्मे आहे. या जोडप्याला पुत्ररत्न प्राप्ती झाली. एस्लेस्टन यांना पाच नातवंड आहेत आणि येत्या ऑक्टोबरमध्ये ते 90 वर्षांचे होतील.

त्यांनी सांगितले की,''आम्हाला मुलगा झाला आहे आणि त्याचं नाव ऐस असं ठेवलं आहे. मला अभिमान वाटतोय.'' स्वित्झर्लंड येथील घरी एस्लेस्टन आणि फॅबिआना सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. एस्लेस्टनला आधी तीन मुली आहेत आणि मुलगा झाल्यानं त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. त्यानं सोशल मीडियावर नव्या बाळाचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी एस्लेस्टन यांनी 90व्या वर्षीही बाप बनण्याचा निर्धार बोलून दाखवला.  


नव्या बाळाची मोठी बहीण 65 वर्षांची आहे. एस्लेस्टन यांची पहिली पत्नी एव्ही बॅमफोर्ड यांची ती मुलगी आहे. त्यानंतर दुसऱ्या पत्नी स्लॅव्हिका रॅडीकनं तमारा ( 35) आणि पेट्रा ( 31) या दोन मुलींना जन्म दिला. 2012मध्ये एस्लेस्टन यांनी मार्केटिंग डायरेक्टर फॅबिआना हिच्याशी विवाह केला. तिनं क्रोएशियन मॉडल रॅडीकसोबत 2009मध्ये घटस्फोट घेतला होता. 2009च्या वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स परिषदेत एस्लेस्टन आणि फॅबिआना यांची भेट झाली.


एका मासेमार करणाऱ्या कुटुंबात 1930मध्ये एस्लेस्टन यांचा जन्म झाला. 1949मध्ये त्यांनी मोटरसायकल शर्यतीत पहिले पाऊल टाकले.

भारतीय क्रिकेटपटूंना ओळखलंत का? अष्टपैलू खेळाडूनं शेअर केला पहिल्या मुलाखतीचा व्हिडीओ

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं 64 वर्षीय वृद्धाला गाडीनं उडवलं; थरकाप उडवणारा Video व्हायरल!

पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय खेळाडू आमची माफी मागायचे - शाहिद आफ्रिदी

Web Title: I want to be a dad again at 90… and I don’t need Viagra, ex-F1 boss Bernie Ecclestone says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :carकार