ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यातून एस जयशंकर यांना बाजूला ठेवल्याचा दावा खोटा; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 18:47 IST2025-01-24T18:43:48+5:302025-01-24T18:47:52+5:30

परराष्ट्री मंत्री एस जयशंकर यांना ट्रम्प यांच्या शपथविधीतून बाजूला केल्याचा दावा केला आहे.

Claim that S Jaishankar was left out of Trump's swearing-in ceremony is false Know the details | ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यातून एस जयशंकर यांना बाजूला ठेवल्याचा दावा खोटा; जाणून घ्या सविस्तर

ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यातून एस जयशंकर यांना बाजूला ठेवल्याचा दावा खोटा; जाणून घ्या सविस्तर

Claim Review : ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान एस जयशंकर यांना मागे ढकलण्यात आले.
Claimed By : Facebook And X Users
Fact Check : चूक

Created By: Boom 

Translated By: ऑनलाइन लोकमत

गेल्या दोन दिवसापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला जगभरातील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या बाबत एक दावा करण्यात आला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान जयशंकर यांना बाजूला ढकलण्यात आल्याचा दावा सोशल मीडिया वापरकर्ते करत आहेत. यावर आता बूमने फॅक्ट चेक केले आहे. या फॅक्ट चेकमध्ये असे आढळून आले की, समारंभादरम्यान, एका कर्मचाऱ्याने एस जयशंकर यांच्या समोर उभ्या असलेल्या एका महिला छायाचित्रकाराला मागे जाण्याचा इशारा केला. 

शपथविधी सोहळ्याच्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये असे दिसून आले की, कर्मचाऱ्यांनी पुढच्या रांगेतून कार्यक्रमाचे फोटो काढणाऱ्या एका छायाचित्रकाराला मागे जाण्याची विनंती केली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा कॅपिटल रोटुंडा येथे आयोजित केला होता. यावेळी अनेक विदेशी पाहूणे उपस्थित होते.  यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपस्थित होते. ते पहिल्या रांगेत बसल्याचे दिसत आहे. यावेळी त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या विदेश मंत्र्यांची भेट घेतली. 

एस जयशंकर यांनी आपल्या एक्स खात्यावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपतिधी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. 

व्हिडिओमध्ये जोडलेल्या मजकुरात असे म्हटले आहे की, एक पुरूष महिलेच्या कानात काहीतरी कुजबुजतो, त्यानंतर ती महिला जयशंकर यांच्याकडे जाते आणि त्यांना बाहेर जाण्यास सांगते. पण जयशंकर यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि तिथेच उभे राहिले. 

एका वापरकर्त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले, 'ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना मागे ढकलण्यात आले! (संग्रह लिंक)

तथ्य तपासणी

ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात जयशंकर यांना बाजूला ठेवण्यात आले होते हा दावा खोटा आहे. बूमला आढळले की, कार्यक्रमादरम्यान, एका कर्मचाऱ्याने जयशंकर यांच्यासमोर उभ्या असलेल्या एका महिला कॅमेरामनला हातवारे केले.

व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी, BOOM ने २० जानेवारी २०२५ रोजी द जॉइंट काँग्रेसनल कमिटी ऑन इनामेल सेरेमनीज (JCCIC) च्या यूट्यूब चॅनलवर शपथविधी सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहिले. १९०१ पासून, JCCIC अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी समारंभाचे आयोजन आणि अंमलबजावणी करत आहे.

व्हिडिओच्या ३.०८.०५ पासून, एक महिला छायाचित्रकार समोरून वेगवेगळ्या कोनातून फोटो काढत असल्याचे दिसून येते. थोड्या वेळाने (३.०८.३३), ती पहिल्या रांगेत उभ्या असलेल्या जयशंकर यांच्यासमोर जाते आणि फोटो काढू लागते.

हे पाहून महिला कर्मचारी त्यांच्याकडे येतात आणि छायाचित्रकाराला परत जाण्याची विनंती करतात. हे ३.०८.५० च्या वेळेनुसार पाहता येईल. कर्मचारी तिथून निघून जाताच, काही वेळाने छायाचित्रकारही तिथून निघून मागच्या बाजूला जाताना दिसतो. हे ३.०९.१८ च्या वेळेनुसार दिसून येते.

या दरम्यान, एस जयशंकर त्यांच्या जागी उभे राहतात. व्हिडीओ झूम इन केल्यावर, कर्मचारी महिला छायाचित्रकाराला थाप मारते आणि परत जाऊन फोटो काढण्यास सांगते हे स्पष्ट होते. यावेळी, ती जयशंकर यांच्कयाडे पाहत नव्हती तर खालच्या कोनातून फोटो काढणाऱ्या छायाचित्रकाराकडे पाहत होती. 

हा विशिष्ट भाग खाली लाईव्ह फीडमध्ये पाहता येईल.

https://hindi.boomlive.in/content/servlet/RDESController?command=rdm.ServletVideoPlayer&app=rdes&partner=boomlivehi&type=7&sessionId=RDWEBJ79CXQFBYOOSWTQZDPJ57YXBXELNR11S&uid=video_57807wuhTiZadFyOlOAos7DYX6pa501A3eOy84799743

(सदर फॅक्ट चेक Boom  या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

Web Title: Claim that S Jaishankar was left out of Trump's swearing-in ceremony is false Know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.