Fact Check: आमिर खाननं India's Got Latent वादावर भाष्य केले नाही; व्हायरल व्हिडिओ जुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 11:31 IST2025-02-27T11:30:53+5:302025-02-27T11:31:31+5:30

रणवीर अलाहाबादियाकडून केलेल्या विधानाचा अभिनेता आमिर खानने चांगलाच समाचार घेतला असा दावा करणारा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

Fact Check: Aamir Khan did not comment on India's Got Latent controversy; Viral video is old, he talks on AIB Roast show | Fact Check: आमिर खाननं India's Got Latent वादावर भाष्य केले नाही; व्हायरल व्हिडिओ जुना

Fact Check: आमिर खाननं India's Got Latent वादावर भाष्य केले नाही; व्हायरल व्हिडिओ जुना

Claim Review : इंडियाज गॉट लेटेंट वादावर अमिर खानने नाराजी व्यक्त केली
Claimed By : Instagramm User - theindianadda_
Fact Check : चूक

Created By: विश्वास न्यूज
Translated By: ऑनलाइन लोकमत

प्रसिद्ध युट्यूब शो 'इंडियाज गॉट लेटेंट' सध्या देशभरात वादात अडकला आहे. या शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने केलेल्या एका विधानानं लोकांमध्ये संताप उसळला. त्यानंतर या रणवीर आणि समय रैना यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यातच अभिनेता आमिर खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात आमिरने शोमधील वादग्रस्त विधानाला विरोध केल्याचं दिसून येते. रणवीर अलाहाबादियाकडून केलेल्या विधानाचा अभिनेता आमिर खानने चांगलाच समाचार घेतला असा दावा करणारा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

पडताळणीत काय आढळलं?

जेव्हा व्हायरल होणाऱ्या व्हिडिओची पडताळणी केली तेव्हा हा व्हिडिओ २०१५ चा असल्याचं आढळलं. आमिर खान हा यूथ फॉर गर्व्हनेंस २०१५ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यावेळी एआयबी नॉकआऊट शोबाबत त्याने प्रतिक्रिया दिली होती. हा व्हिडिओ काही लोक नुकताच वादात सापडलेला इंडियाज गॉट लेटेंटवरील आमिर खानची प्रतिक्रिया म्हणून व्हायरल करत आहेत. परंतु या व्हिडिओचा रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना याच्याशी कुठलाही संबंध नाही. 

व्हायरल व्हिडिओत काय म्हटलंय?

सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर theindianadda नावाच्या युजर्सने १३ फेब्रुवारी २०२५ रोजी हा व्हायरल व्हिडिओ शेअर केला. त्यात कॅप्शनमध्ये दावा केला की, आमिर खानने अप्रत्यक्षपणे इंडियाज गॉट लेटेंट शो आणि #RanveerAllahbadia याबाबतीत त्याचे मत प्रदर्शित केले. 

या पोस्टची आर्काइव्ह लिंक येथे पाहा

सत्यता कशी पडताळली?

व्हायरल व्हि़डिओची पडताळणी करताना आधी व्हिडिओचे स्क्रिनशॉट्स काढले त्यातून गुगल लेन्सच्या मदतीने फोटो सर्च करण्यात आले. त्यात Moives Talkies नावाच्या एका अधिकृत युट्यूब चॅनेलवर आमिर खानचा हा व्हिडिओ सापडला. हा व्हिडिओ ११ फेब्रुवारी २०१५ रोजी अपलोड केला होता. त्यात आमिर खान एआयबी रोस्ट शोवर त्याची प्रतिक्रिया देत होता. 

या व्हिडिओशी संबंधित एक बातमी Ndtv च्या वेबसाईटवर दिसून आली. ११ फेब्रुवारी २०१५ रोजी ही बातमी प्रकाशित करण्यात आली होती. मुंबईतल्या एका पत्रकार परिषदेत आमिर खानने एआयबी शोवर त्याचे मत नोंदवले. आमिर म्हणाला की, आतापर्यंत मी त्यांनी केलेले रोस्ट पाहिले नाही. परंतु काही क्लिप मला पाहण्यात आल्या. माझा मित्र करण जौहर आणि अर्जुन कपूरकडून मी शोबाबत ऐकलंय. त्यांना हे अजिबात आवडलं नाही. अशाप्रकारे अभद्र भाषेचा वापर करणं हिंसक आहे असं त्याने सांगितले होते.

आणखी एका सर्चवेळी व्हायरल बातमी दैनिक जागरणच्या वेबसाईटवर आढळली. ती जुलै २०२१ मध्ये प्रकाशित झाली होती. त्याशिवाय ११ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रकाशित अमर उजालाच्या बातमीत इंडियाज गॉट लेटेंटवरील विधानांमुळे लोक हैराण आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर युट्यूबवरील या शोचे सर्व व्हिडिओ हटवण्यात आले.

व्हायरल व्हिडिओसह जोडलेले अन्य रिपोर्ट्स इथं पाहू शकता.

निष्कर्ष - व्हायरल व्हिडिओत आमिर खान इंडियाज गॉट लेटेंटच्या वादावर भाष्य करत नसून सदर व्हिडिओ २०१५ चा असून त्यात तो एआयबी रोस्ट शोवर भाष्य करत आहे. या व्हिडिओचा नुकत्याच सुरू असलेल्या इंडियाज गॉट लेटेंट वादाशी संबंध नाही.

(सदर फॅक्ट चेक विश्वास न्यूज या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

Web Title: Fact Check: Aamir Khan did not comment on India's Got Latent controversy; Viral video is old, he talks on AIB Roast show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.