खरेच स्वाती मालिवाल अन् ध्रुव राठी यांच्यात फोनवरून संभाषण झाले? पाहा, व्हायरल ऑडिचे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 01:53 PM2024-05-30T13:53:43+5:302024-05-30T14:06:49+5:30

Fact Check: कथित मारहाणप्रकरणानंतर स्वाती मालिवाल यांनी ध्रुव राठीला फोन करून व्हिडिओ बनवू नका, असे सांगितल्याची डीफफेक केलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

fact check aap mp swati maliwal and youtuber dhruv rathi ai generated call audio | खरेच स्वाती मालिवाल अन् ध्रुव राठी यांच्यात फोनवरून संभाषण झाले? पाहा, व्हायरल ऑडिचे सत्य

खरेच स्वाती मालिवाल अन् ध्रुव राठी यांच्यात फोनवरून संभाषण झाले? पाहा, व्हायरल ऑडिचे सत्य

Claim Review : स्वाती मालिवाल आणि ध्रुव राठी यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल
Claimed By : Social Media User
Fact Check : चूक

Created By: BOOM
Translated By: ऑनलाइन लोकमत

Fact Check: आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांना झालेल्या कथित मारहाणीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक केली होती. यानंतर त्यांचा जामीन नाकारण्यात आला होता. एकीकडे लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्पात आली आहे, दुसरीकडे अरविंद केजरीवाल अंतरिम जामिनावर बाहेर आल्यावर सातत्याने भाजपावर आणि पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. या घडामोडींमध्ये स्वाती मालिवाल यांच्या प्रकरणामुळे दिल्लीच्या राजकारण मोठी खळबळ उडवून दिल्याची चर्चा आहे. यातच युट्युबर ध्रुव राठी आणि स्वाती मालिवाल यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याचा ऑडिओ व्हायरल झाला. मात्र, हा ऑडिओ डीपफेक असल्याचे समोर आले आहे.

आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल आणि यूट्यूबर ध्रुव राठी यांच्यात संभाषण झाल्याचा दावा करणारा एक ऑडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल ऑडिओमध्ये स्वाती मालिवाल ध्रुव राठीला नुकत्याच घडलेल्या घटनेबद्दल सांगत आहेत. तसेच अरविंद केजरीवाल आणि त्यांची पत्नी सुनीता यांच्यासमोर तिला मारहाण करण्यात आल्याचे सांगत आहेत. ऑडिओमध्ये ती ध्रुव राठीला या मुद्द्यावर व्हिडिओ न बनवण्याचा सल्ला देताना या ऑडिओमध्ये ऐकायला येत आहे. 

हा ऑडिओ व्हायरल होत आहे

व्हायरल ऑडिओ AI वापरून तयार केल्याचे तपासात आढळून आले आले. हा खरा ऑडिओ नाही. १३ मे २०२४ रोजी स्वाती मालिवाल यांनी अरविंद केजरीवाल यांचे सचिव विभव कुमार यांच्यावर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात मारहाण केल्याचा आरोप केला होता. एफआयआर नोंदवल्यानंतर दिल्ली पोलिसांनी १८ मे रोजी विभव कुमारला अटक केली आणि त्याला पोलीस कोठडीत दिली. यानंतर यूट्यूबर ध्रुव राठीने या घटनेवर

View this post on Instagram

A post shared by Dhruv Rathee (@dhruvrathee)

" target="_blank">व्हिडिओ बनवला, ज्यामध्ये त्याने मालिवाल यांच्यावर खोटी तक्रार केल्याचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर हा ऑडिओ व्हायरल होत आहे.

ध्रुव विरोधकांच्या अजेंड्यावर व्हिडिओ बनवतो

यूजर्स हा ऑडिओ खरा असल्याचे समजून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. एक्सवर पोस्ट करताना एका pic.twitter.com/gwaecsSanf

— Sudheer Pandey(मोदी का परिवार ) (@SudhirPandey_IN) May 24, 2024 " target="_blank">यूजरने लिहिले की, “दिल्ली, स्वाती मालिवाल आणि ध्रुव राठी यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. स्वाती मालिवाल यांनी ध्रुव राठी यांना विनंती करून व्हिडिओ बनवू नका, असे सांगितले. केजरीवाल आणि सुनीता यांच्या सांगण्यावरून ही मारहाण झाली. ध्रुव विरोधकांच्या अजेंड्यावर व्हिडिओ बनवतो”, असे कॅप्शन दिले आहे. (अर्काइव्ह लिंक)

फॅक्ट चेक तपासात काय आढळून आले?

जेव्हा सत्य तपासणीसाठी व्हायरल ऑडिओ काळजीपूर्वक ऐकला तेव्हा आम्हाला संशय आला की, तो AI द्वारे तयार केला गेला आहे. pic.twitter.com/gwaecsSanf

— Sudheer Pandey(मोदी का परिवार ) (@SudhirPandey_IN) May 24, 2024 " target="_blank">0:09 काउंटरवर स्वाती मालिवाल यांचा आवाज ऐकू येतो की, तिला अरविंद आणि सुनीता केजरीवाल यांच्यासमोर मारण्यात आले. या ऑडिओमध्ये एक जंप कट असल्याचे आढळून आले. यावरून आम्ही आयआयटी जोधपूरने तयार केलेले डीपफेक टूल इतिसार यावर या ऑडिओ क्लिपचे परीक्षण केले. यामध्ये डीपफेक ऑडिओ असल्याचा रिपोर्ट आला. आम्ही Contrails AI येथील संशोधकांना ऑडिओ क्लिप पाठवली. त्यांनी दुजोरा दिला की, दोन्ही व्यक्तींच्या आवाजात एआय व्हॉइस क्लोनिंगचे स्पष्ट पॅटर्न आढळून आला आहे. त्यांनी सांगितले की, व्हायरल कॉल ऑडिओ एक AI ऑडिओ स्पूफ (AI audio spoof) आहे.

(सदर फॅक्ट चेक BOOM या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

 

Web Title: fact check aap mp swati maliwal and youtuber dhruv rathi ai generated call audio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.