Fact Check :"भाजपावाल्यांना सांगा, मी मूर्ख नाही"; AAP ने शेअर केलेला पंकज त्रिपाठीचा 'तो' Video एडिटेड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 18:32 IST2024-12-05T18:30:07+5:302024-12-05T18:32:22+5:30
Fact Check : अभिनेता पंकज त्रिपाठी भारतीय जनता पक्षाला (भाजप) मतदान करण्याच्या विरोधात बोलल्याचा दावा व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.

Fact Check :"भाजपावाल्यांना सांगा, मी मूर्ख नाही"; AAP ने शेअर केलेला पंकज त्रिपाठीचा 'तो' Video एडिटेड
Created By: logically facts
Translated By: ऑनलाईन लोकमत
२०२५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टी (AAP) च्या अधिकृत X अकाऊंटवरून ५ डिसेंबर २०२४ रोजी अभिनेता पंकज त्रिपाठी असलेला एक व्हिडीओ शेअर केला होता. त्रिपाठी भारतीय जनता पक्षाला (भाजप) मतदान करण्याच्या विरोधात बोलल्याचा दावा व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.
क्लिपमध्ये, त्रिपाठी, शेंगदाणा विक्रेत्याच्या वेशात, त्याचा फोन चेक करतो. तो म्हणतो, “मी शेंगदाणे विकतो, माझा मेंदू नाही. हा मेसेज पाहा. आम्हाला मतदान करा, असं सांगत भाजपाने हे पाठवलं आहे. इथे आम्ही त्यांना मत देऊ आणि तिथे आमचे पैसे गायब होतील… लक्षात ठेवा, जर भाजपाने तुम्हाला फसवलं तर म्हणा, 'मी मूर्ख नाही.'” ही पोस्ट थोड्या वेळाने हटवण्यात आली असली तरी तिला ६५००० पेक्षा जास्त व्ह्यूज, १००० लाईक्स मिळाले होते आणि ४०० पेक्षा जास्त रिपोस्ट करण्यात आल्या होत्या. अर्काइव्ह पोस्ट
इतर अनेक AAP-संलग्न X अकाऊंटने देखील व्हिडीओ शेअर केला आहे. अर्काइव्ह व्हर्जन येथे आणि येथे पाहिता येईल.
तथापि, आमच्या तपासणीत असं आढळून आलं की, व्हिडिओमध्ये बदल करण्यात आला आहे. मूळ व्हिडिओमध्ये घोटाळ्यांविरुद्ध सावधगिरी बाळगा असं दाखवलं जात आहेत.
आम्हाला काय सापडलं?
व्हायरल क्लिपची रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर आम्ही मूळ व्हिडिओकडे पोहोचलो, जो २३ सप्टेंबर २०२४ रोजी UPI Chalega (येथे अर्काइव्ह) चॅनेलद्वारे YouTube वर अपलोड केला गेला होता. व्हिडिओचे शीर्षक “शेंगदाणावाला | बनावट लॉटरी लिंक | UPI सुरक्षा जागरूकता,” UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) घोटाळ्यांबद्दल जनजागृती मोहिमेचा एक भाग होता.
मूळ व्हर्जनमध्ये, संभाव्य फसवणुकीबद्दल दर्शकांना इशारा देताना त्रिपाठी UPI पेमेंटला प्रोत्साहन देतो. तो हिंदीत म्हणतो, “मी शेंगदाणे विकतो, माझा मेंदू नाही. हा मेसेज पाहा - त्यात लिहिलं आहे, ‘तुम्ही लॉटरी जिंकली आहे, लिंकवर क्लिक करा, तुमचा UPI पिन टाका आणि पैसे जिंका!’ मला माहीत नाही का? मी माझा UPI पिन टाकतो आणि माझे पैसे कापले जातात. मी एक शेंगदाणे विक्रेता आहे, मूर्ख नाही. लक्षात ठेवा, UPI म्हणतं - जर कोणी तुम्हाला आमिष दाखवत असेल तर म्हणा, 'मी मूर्ख नाही.'"
अनेक विसंगती दर्शवतात की, व्हिडीओ डिजिटलरित्या बदलला गेला आहे. व्हायरल क्लिपमध्ये ०:०९ ला, त्रिपाठीच्या मोबाईल स्क्रीनवर "भाजपाला मत द्या" हे मेसेजसह दाखवतात, परंतु हा मेसेज एडिट केलेला आहे. मूळ व्हिडिओमध्ये, व्हाईट बॅकग्राऊंडवर काळ्या रंगात Winner असा टेक्स्ट लिहिलेला आहे.
याव्यतिरिक्त, व्हायरल व्हिडिओमधील लिप-सिंक मूळ क्लिपशी जुळत नाही, पुढे पुष्टी करतं की, त्रिपाठी भाजपाच्या विरोधात बोलत असल्याचं खोटं चित्रित करण्यासाठी व्हिडिओमध्ये फेरफार करण्यात आला आहे.
ऑडिओमध्ये पंकज त्रिपाठीच्या आवाजाशी साम्य आहे, जे आर्टिफिशियल इंटिलेजिन्सचा वापर करून केलं आहे. TrueMedia, ऑनलाइन डीपफेक शोधण्याचं साधन आहे. यातून क्लिपमध्ये फेरफार केल्याचा महत्त्वपूर्ण पुरावा आढळला, एका डिटेक्टरने ८५ टक्के शक्यता दर्शवितं की, ऑडिओ AI टूलद्वारे तयार केला गेला आहे.
निष्कर्ष
अभिनेता पंकज त्रिपाठी याचा एक डिजिटली बदललेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात त्यांनी लोकांना भाजपाला मतदान न करण्याचं आवाहन केलं आहे. प्रत्यक्षात, अभिनेता दर्शकांना UPI फसवणुकीबद्दल सावध करत होता.
(सदर फॅक्ट चेक logically facts या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)