Fact Check : "भाजपा-महायुती आहे तर गती आहे, गुजरातची प्रगती आहे"; व्हायरल होणारा फोटो एडिटेड, 'हे' आहे 'सत्य'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 12:55 PM2024-11-09T12:55:51+5:302024-11-09T12:57:47+5:30
Fact Check : महायुती महाराष्ट्रामध्ये गुजरातच्या प्रगतीसाठी मतं मागत असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) पोस्टरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Created By: The Quint
Translated By: ऑनलाइन लोकमत
महायुती महाराष्ट्रामध्येगुजरातच्या प्रगतीसाठी मतं मागत असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) पोस्टरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो शेअर करणाऱ्यांनी "गुजरातच्या प्रगतीसाठी भाजपा महायुतीला मतदान करा…" असं मराठीमध्ये कॅप्शन दिलं आहे. या पोस्टला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. या दाव्याच्या अर्काइव्ह लिंक येथे आणि येथे सापडतील.
हा फोटो खरा आहे का?
हा फोटो खरा नाही. प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठी तो एडिट करण्यात आला आहे. मूळ फोटोमध्ये महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मतांसाठी युती दाखवण्यात आली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवर बारकाईने नजर टाकली असता फोटोवर 'गुजरातची' हा शब्द मॉर्फ करण्यात आला होता हे दिसून येईल.
काय आहे मूळ पोस्टर?
टीम वेबकूफने रिव्हर्स इमेज सर्च केली. ३ नोव्हेंबरला प्रवीण भानुशाली नावाच्या एक्स हँडलने अपलोड केलेला असाच एक फोटो सापडला. या व्यक्तीने स्वत:ला भारतीय जनता युवा मोर्चाचा सरचिटणीस म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी युती मतं मागत असल्याचं पोस्टरमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. "भाजप-महायुती आहे, तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे" असं यावर लिहिलं आहे.
भाजप- महायुति आहे,तर गती आहे
— Pravin Bhanushali (@BjpPravin1) November 3, 2024
महाराष्ट्राची प्रगती आहे|#BJPMAHARASHTRApic.twitter.com/cZXultp85K
निष्कर्ष : व्हायरल दावा करण्यासाठी हा फोटो एडिट केल्याचं स्पष्ट झालं आहे.
(सदर फॅक्ट चेक The Quint या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)